शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

‘बीआरटी’वरून भाजपात गटबाजी, ‘स्थायी’त चर्चा प्रकल्पाची घाई जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 03:04 IST

पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बीआरटी सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावरून भाजपातच दोन गट पडले आहे. एक गट प्रशासनाबरोबर असून, दुस-या गटाने बीआरटी प्रकल्पावरून सावध पवित्रा घेतला आहे.

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी बीआरटी सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यावरून भाजपातच दोन गट पडले आहे. एक गट प्रशासनाबरोबर असून, दुस-या गटाने बीआरटी प्रकल्पावरून सावध पवित्रा घेतला आहे.स्थायी समितीत बीआरटी प्रकल्पावर चर्चा झाली. या वेळी प्रकल्पासाठीचा निधी मागे गेला तरी चालेल, मात्र या मार्गावर कोणत्याही प्रवाशाचा जीव गेला, तर ते परवडणार नाही, अशी भूमिका स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना दापोडी ते निगडी बीआरटीबाबत सीमा सावळे यांनी आक्षेप घेतला होता. सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती. सत्तेत आल्यानंतरही सावळे यांची भूमिका कायम आहे. स्थायी समितीच्या बैठकीत बीआरटी प्रकल्पावर जोरदार चर्चा झाली. बीआरटीवरून सत्ताधारी विरुद्ध प्रशासन असे चित्र निर्माण झाले.सभापती सावळे आणि आशा शेंडगे यांनी भूमिका मांडली. सावळे म्हणाल्या, ‘‘दापोडी ते निगडी बीआरटी मार्ग कसा चुकीचा आहे, सुरक्षा उपाय केले नसल्याने अपघात होऊ शकतात, ही बाब तत्कालीन नगरसदस्य असताना निदर्शनास आणून दिली होती. मर्ज इन आणि मर्ज आऊट, तसेच अंडरपासच्या ठिकाणी वळणावर प्रभावीपणे सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाहीत. म्हणून आक्षेप नोंदविले होते. आताही प्रशासन सुरक्षेच्या उपाययोजना न करता प्रकल्प सुरू करण्याची घाई नको.सत्तेत येऊनही मी आक्षेप घेतले असताना सुरुवातीला आक्षेप घेणाºयांना प्रशासनाने माहिती देणे गरजेचे होते. सुरक्षेसंदर्भात माहिती देण्याचा व पाहणी दौरा असताना काही तास अगोदर मला माहिती दिली, ही बाब चुकीची आहे, असा आक्षेप सीमा सावळे यांनी घेतला.

पुणे-मुंबई महामार्गावरील बीआरटी सेवा सुरू झाली, तर त्याचा फायदा सार्वजनिक वाहतूकसेवा सक्षमीकरणास होणार आहे. पवई आयआयटीने केलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली आहे. पाहणी केल्यानंतर पथकाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. प्रकल्प वेळेत सुरू केला नाही, तर निधीवर परिणाम होईल.- श्रावण हर्डीकर, आयुक्तनिधी मागे गेला तरी चालेल; मात्र या मार्गावर कोणाचा जीव गेला तर परवडणार नाही. सुरक्षा उपाययोजनांची माहिती देणे गरजेचे आहे. बीआरटीमुळे वाहतूक सेवा सुरळीत नाही, तर आणखी जटिल होणार आहे. प्रवाशांनाही याचा त्रास सहन करावा लागणार आहे.- सीमा सावळे, अध्यक्षा स्थायी समिती

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड