शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

विनोदी नाट्यातून अहिराणीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:45 IST

पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यमंदिरात झालेल्या अहिराणी शब्दबंधन आयोजित ‘जागर अहिराणीचा’ या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अहिराणी भाषेचा आस्वाद घेत मोठ्या संख्येने प्रेक्षागृहात रसिकांनी हजेरी लावली.

सांगवी : पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळूभाऊ फुले नाट्यमंदिरात झालेल्या अहिराणी शब्दबंधन आयोजित ‘जागर अहिराणीचा’ या कार्यक्रमात प्रेक्षकांनी अहिराणी भाषेचा आस्वाद घेत मोठ्या संख्येने प्रेक्षागृहात रसिकांनी हजेरी लावली. दीपप्रज्वलन करून खान्देशची कुलदैवत गौराईचे पूजन करण्यात आले.नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, नगरसेवक नामदेव ढाके, मच्छिन्द्र ढोरे, हिरेन सोनवणे आदी या वेळी उपस्थित होते. मंत्रालयात प्राणत्याग केलेले खान्देशचे आजोबा धर्मा पाटील व शहीद जवानांना या वेळी श्रद्धांजली वाहिली.अहिराणी भाषेतील खान्देश रत्नांच्या मुलाखतीतून खान्देशातील प्रमुख प्रश्नांना या वेळेस उजाळा देण्यात आला. दिवंगत भाऊसाहेब हिरे यांच्या स्वप्नातली खान्देशी नारपार दमणगंगा योजना जर पूर्णपणे अस्तित्वात आली, तर उत्तर महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् झाला असता, असे मत प्रवक्ता सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. अहिराणी भाषा संशोधक बापूसाहेब हटकर म्हणाले, ‘‘अहिराणी भाषा दोन हजार वर्षांपूर्वीची आहे. पण या भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला नाही. म्हणून ती दुर्लक्षित राहिली. त्यामुळे या भाषेला प्रमाणभाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आंदोलने करावे लागतील.’’खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या परिसरातून रोजगार व नोकरीच्या शोधात व पुण्यात स्थायिक झालेल्या उद्योजकांची यशोगाथा उलगडत मुलाखतकार जितेंद्र चौधरी यांनी उद्योजकांना बोलते केले. महेंद्र पाटील, दीपक पाटील, पंकज निकम, पी. टी. चौधरी, जगदीश पाटील, पीतांबर लोहार, देवयानी पाटील, योगेश कुलकर्णी, प्रस्तुतकर्ता पारस बाविस्कर, ससून रुग्णालयाचे डॉक्टर आर. टी. बोरसे यांनी या मुलाखतीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. हिंदी व मराठीतून लवकरच प्रदर्शित होत असलेल्या ‘मोल’ चित्रपटाचे प्रमोशन या वेळी करण्यात आले.विनोदी अहिराणी कलाकार प्रवीण माळी यांचा ‘आयतं पोयतं सख्यांन’ याच्या १८९ व्या प्रयोगाचे सादरीकरण झाले. अहिराणी शब्दबंधनचे कार्यकर्ते शशिकांत पाटील, खुशाल पाटील, हितेंद्र बडगुजर, संजय क्षीरसागर, दीपक वारुडे, कैलास पाटील, समाधान पाटील, राजू पाटील आदींनी परिश्रम घेतले. मुलाखतकार जितेंद्र चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या