शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

यश मिळविणे सोपे, टिकविणे अवघड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 14:30 IST

संगीत ही साधना आहे, व्रत आहे. त्यात कोणताही शॉर्टकट नाही. यश मिळविणे सोपे आहे, ते टिकविणे अवघड आहे.

- विश्वास मोरे पिंपरी : संगीत ही साधना आहे, व्रत आहे. त्यात कोणताही शॉर्टकट नाही. यश मिळविणे सोपे आहे, ते टिकविणे अवघड आहे. नवतेच्या नावाखाली जुन्या गाण्यांचे विडंबन करण्याची वृत्ती वाढत आहे, ती रोखण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध संगीतकार आणि गायक रूपकुमार राठोड यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड शहरात आशा भोसले पुरस्काराने त्यांचा शनिवारी गौरव होणार आहे. त्यानिमित्ताने साधलेला संवाद.मागे वळून पाहताना काय वाटते? पुरस्काराविषयी आपले मत काय?- मागे वळून पाहताना विशेष आनंद होतो. संगीतसेवा हीच ईश्वरसेवा आहे. त्यामुळे मी समाधानी आणि प्रसन्न आहे. संगीत हे रक्तात असते. त्याचप्रमाणे माझी वाटचाल झाली. माझे वडील नेहमी सांगायचे, आपल्याला जी गोष्ट करायची ती पूर्णपणे समजून घ्यायला हवी. शिकायला हवी. म्हणून मी शिकाऊ वृत्ती कायम ठेवली आहे. आशा भोसले यांच्याविषयी किती आणि काय बोलावे. बोलावे तेवढे कमीच आहे. त्या संगीताचे विद्यापीठ आहेत. ऊर्जास्रोत आहेत. त्यांच्यातील उत्साह पाहिला की आम्हाला प्रेरणा मिळते. प्रोत्साहन मिळते. मी त्यांना गाताना पाहिलेय. नृत्य करताना पाहिलेय. व्यासपीठावर कला सादर करताना खरेच आशाताई म्हणजे एनर्जी टॉवर आहेत. एवढा सुंदर आवाज, खरे तर ही एक ईश्वरी देणेच आहे.भारतीय चित्रपट संगीतात रीमिक्सचे फॅड आले आहे. ते योग्य की अयोग्य?- काटा लगा, हे मूळ गाणे किती सुंदर आहे. मात्र, ते रिमिक्सनंतर किती व्हल्गर झाले. नावीन्य हवे, परंतु विडंबन केले जाऊ नये. खरे तर आजच्या युगासाठी नवीन काय द्यायचे हा संगीतकारांचा प्रयत्न असतो. नवनिर्मिती ओरिजनल असो. आपल्या मातबर संगीतकारांनी तयार केलेली जुनी गाणी ही खूप चांगली आहेत. त्यांचे विडंबन करणे योग्य नाही. कारण जुन्या गाण्यांनी एक इतिहास रचला आहे. त्या उज्ज्वल अशा परंपरेस तडा देण्याचा अधिकार आपणास कोणी दिला, हा माझा प्रश्न आहे.आशातार्इंची एखादी रेकॉर्डिंगची आठवण सांगा?- आठवणी खूप आहेत. दाद देणे हे आशातार्इंकडूनच शिकायला हवे. तक्षकमध्ये आशातार्इंचे एक गाणे होते, ‘मुझे रंग दे, रंग दे...’ आणि त्याच सिनेमात माझेही ‘खामोश रास्ते...’ हे गाणे होते. आशातार्इंनी मला न्यूयॉर्कवरून फोन केला. तोंडभरून कौतुक केले. दाद दिली. रूप, तक्षकमध्ये माझेही गाणे आहे. ते लोकप्रिय असले, तरी तुझेही गाणे अत्यंत सुंदर आहे. मी अनेकदा ऐकले, ते ऐकावेसेच वाटते आणि हो, हे गाणे मलाच नाही तर माझ्या मुलांनाही आवडते, असे त्या म्हणाल्या. याला म्हणतात, एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेली दाद. हा मला मिळालेला आशीर्वाद आहे. आजकाल दुसऱ्यांना दाद देण्याची वृत्ती कमी होत आहे.नवकलावंतांना रिअ‍ॅलिटी शोशाप की वरदान?- रिअ‍ॅलिटी शोमधून नवीन मुलांना कला सादर करण्याची संधी मिळते. आमच्या काळात असे काही नव्हते. त्यामुळे गुरू-शिष्य परंपरेने आम्ही शिकलो. सराव केला. प्रयोगांतून घडत गेलो. त्या काळी हार्मोनियम घेऊन बैलगाडीतून प्रवास करून गायनाचे कार्यक्रम केले आहेत. गावोगावी जाऊन संगीत ऐकविले. त्या वेळी प्लॅटफॉर्म नव्हता. माझ्या मते सोन्याला झळाळी येण्यासाठी भट्टीमधून जाळून घ्यावे लागते. त्यातूनच सोने अधिक झळाळून निघते.एका महिन्यात एक शो करून सेलिब्रिटी होणे सोपे. सेलिब्रिटी झाल्याने कलावंताच्या डोक्यात हवा जाते. निसर्गाचा नियम आहे, एखादी गोष्ट जेवढ्या वेगाने वर जाईल तेवढ्याच वेगाने खाली येते. हे पाहा, इंडियन आयडलच्या दहा पर्वांतील विजेते कोठे आहेत? त्यांना काम मिळत नाही. डोक्यात हवा जाऊ न देणे आणि संधीचे सोने करून पुढे चालत राहण्यासाठी रिअ‍ॅलिटी शो वरदान आहे. संगीतात रियाज महत्त्वाचा आहे. मी १९८६ मध्ये गायन सुरू केले. आजही शिकतच आहे. आता कुठे पुरस्कार मिळत आहेत. शिकणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. संगीत महासागर आहे.

सात स्वरांचा अर्थ आपण वेगळेपणाने सांगता?- वडिलांनी मला सात स्वरांचा जीवनातील अर्थ समजावून सांगितला होता. सा समझ, रे से रियाज, ग से ज्ञान, म से माया मिळते, प से परेमश्वर, ध से ध्यान. संगीत समजून घेऊन रियाज केल्यास ज्ञान प्राप्त होते. ज्ञानप्राप्तीनंतर लोकप्रियेच्या मायेत कलावंत अडकतो.त्यानंतर ही माया फोल आहे, ही जाणीव परमेश्वर करून देतो. त्यातून ध्यानअवस्था प्राप्त होते. त्यातूनच निरंजन, निराकारत्व येते. जसे संत कबीर, तुलसीदास, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, लतादीदी, आशाताई यांनी स्थान प्राप्त केले की ज्यांच्यापर्यंत कोणीही पोहोचू शकत नाही. त्यांनी आपली ओळख तयार केली आहे. चंद्र-सूर्याप्रमाणे त्यांचे स्थान अढळ आहे.