शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

आयटी पार्कची वाहतूककोंडी सुटणार; डांगे चौकात ग्रेड सेपरेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 03:01 IST

महापालिकेच्या निर्णयाने स्थानिक नागरिक व अभियंत्यांना दिलासा

- विश्वास मोरे पिंपरी : हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञाननगरीत जाण्यासाठी आयटी अभियंत्यांना वाहतूककोंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. थेरगाव डांगे चौक ते हिंजवडी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कोंडीचा अनुभव अभियंते व नागरिकांना येतो. डांगे चौकातील कोंडी फोडण्यासाठी ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आयटी पार्क आणि पुण्याला जाणाऱ्या मार्गावर होणारी वाहतूककोंडी सुटणार आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीच्या सीमेवर हिंजवडी असून, त्या ठिकाणी १९९९ मध्ये राजीव गांधी माहिती-तंत्रज्ञाननगरीची पायाभरणी झाली आहे. त्यानंतर देश-परदेशातील आयटी कंपन्या मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. सुमारे दीड लाख अभियंते आणि कामगार या आयनगरीत येत असतात. हिंजवडीत प्रवेश करण्यासाठी वाकड, तसेच थेरगावमार्गे असे दोन रस्ते आहेत. औद्योगिकीकरण वाढल्याने जगताप डेअरी ते हिंजवडी आणि थेरगाव डांगे चौक ते हिंजवडी या रस्त्यावर वाहतूककोंडीचे प्रमाण वाढले आहे.सकाळी नऊ ते सायंकाळी पाचनंतर या भागातील रस्त्यांवर कोंडीचा अनुभव येतो. पाच मिनिटांच्या अंतरासाठी तासन्तास खोळंबा होतो. वाहतूक पोलिसांनी नियोजन केले असले, तरी कोंडीचा सामना अभियंत्यांना करावा लागत आहे. पुनावळे-काळेवाडी फाटा हा बीआरटी रस्ता केला आहे. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी थेरगाव डांगे चौकात छत्रपती शिवाजीमहाराज उड्डाणपुलाची निर्मिती केली आहे. मात्र, बीआरटी लेन पुलाखालून असल्याने कोंडीत भर पडत आहे.डांगे चौकात प्राधिकरण, निगडी, चिंचवड, भोसरी अशा विविध परिसरांतून वाहने येतात. काही वाहने बंगळूर महामार्गावर जातात, तर काही वाहने आयटी पार्कला जातात. पुनावळे, चिंचवडकडून वाहने येण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे चौकात वाहतुकीची कोंडी होत असते. याबाबत महापालिकेने खासगी सल्लागारामार्फत वाहतुकीचे सर्वेक्षण केले होते. त्या वेळी या भागात सकाळी आणि सायंकाळी या दोन वेळेत वाहतूककोंडी होत असल्याचे म्हटले होते. तसेच या चौकाचा अभ्यास केल्यानंतर उड्डाणपूल की ग्रेड सेपरेटर उभारायचा याबाबत अभ्यास केला. रावेत-औंध बीआरटी लेनवर विद्युत विभागाचे टॉवर अधिक आहेत. त्यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या पुलावरून पूल टाकणे अवघड होते, हे पाहणीत आढळून आले. त्यामुळे ग्रेड सेपरेटरचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.चिंचवड-हिंजवडी मार्गावर डांगे चौक येथे दोन लेनचा ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. ४७० मीटर लांबीचा तो असून, आरसीसी बॉक्समध्ये तयार केला जाणार आहे. चौकातील रस्ता ६१ मीटर असून, त्यापैकी १५.५ मीटरच्या दोन लेन, त्यातील एक लेन सात मीटरची असेल. पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या आणि पावसाळी गटार, सांडपाण्याच्या वाहिन्यांचेही नियोजन केले आहे. या कामाची निविदा २३ कोटींची असून, त्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या कामासाठी अर्थसंकल्पात दहा कोटींची तरतूदही केली आहे. दीड वर्षात काम पूर्ण करावे, याबाबतचा आदेश दिला आहे.डांगे चौकातील सिग्नल १६० सेकंदाचा आहे. ग्रेड सेपरेटरमुळे सिग्नल निम्म्याने कमी होणार आहे. पुणे आणि पुनावळेला जाण्यासाठी केवळ ९० सेकंदाचा सिग्नल असेल. तसेच चिंचवडवरून हिंजवडी आणि महामार्गाला जाणाºया वाहनांना डांगे चौक हा सिग्नल फ्री होणार आहे. चिंचवडवरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत असते. त्यामुळे चौकातील कोंडीत भर पडत होती. अवजड वाहने पुलाखालून गेल्याने अपघाताचा धोका कमी होणार आहे.डांगे चौक येथील ग्रेड सेपरेटरच्या कामासाठी दीड वर्षाची मुदत आहे. ग्रेड सेपरेटरमुळे वाहतूककोंडी टाळण्याबरोबरच चिंचवड-हिंजवडीच्या वाहतुकीसाठी हा चौक सिग्नल फ्री होणार आहे. निविदा प्रक्रियेस मंजुरी देण्यात आली आहे. कामाचा आदेश लवकरच देण्यात येणार आहे.- विजय भोजणे, बीआरटी अभियंताग्रेड सेपरेटर लांबी 470 मीटरग्रेड सेपरेटरच्या दोन लेन- 15.5 मीटरनिविदा 23 कोटींचीकालमर्यादा 18 महिनेअर्थसंकल्पात या वर्षी 10 कोटींची तरतूदचिंचवड-हिंजवडीसाठी सिग्नल फ्री चौक

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडी