शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

अतिक्रमण कारवाईवरून अंथुर्णेत तणाव

By admin | Updated: February 15, 2016 01:42 IST

येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढताना ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस व ग्रामस्थांमध्ये मोठा वाद झाला. कारवाई सुरू असताना येथील महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला

अंथुर्णे : येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढताना ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस व ग्रामस्थांमध्ये मोठा वाद झाला. कारवाई सुरू असताना येथील महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला; मात्र येथील माजी सरपंचाने या महिलेची खिल्ली उडवल्याने वातावरण आणखी तणावपूर्ण बनले. संपूर्ण गाव अतिक्रमणांमध्ये असताना, जाणीवपूर्वक आमच्यावरच कारवाई केली जात आहे, असा आरोपही या वेळी येथील ग्रामस्थांनी केला. दरम्यान, रात्री उशिरा सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी ३२ जणांना ताब्यात घेतले. रविवारी (दि.१४) अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने नोटीस बजावली होती. सकाळीच १० ते १२ ट्रॅक्टर, ५ जेसीबी मशिन व सुमारे ४० ते ५० पोलिसांच्या फौजफाट्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, तहसीलदार यांनी शिंदेमळा येथे अतिक्रमणविरोधी कारवाईला सुरुवात केली; मात्र याठिकाणच्या रहिवाशांनी ‘आम्ही गरीब माणसं, घर पाडलं तर कुठं जाणार’ असा सवाल केला; मात्र प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करीत कारवाईला सुरुवात केली. या वेळी रहिवाशांनी आपापल्या घरांपुढील जनावरांचे गोठे, चारा पेटवून दिला. महिला व लहान मुलांसहित सर्वांनी घरांमध्ये कोंडून घेतले. ‘सगळं गाव अतिक्रमणांमध्ये असताना, कारवाई फक्त आमच्यावर का’ असा सवालही केला. यानंतर ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व अतिक्रमणधारकांमध्ये मोठा वाद झाला. या वेळी केशर वाघ (वय ३५) या महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला; मात्र महिला पोलिसांनी तिला वेळीच अडवल्याने अनर्थ टळला. तहसीलदारांसमोर हा प्रकार झाला असताना, तहसीलदारांनी ही कारवाई ग्रामपंचायतीची असल्याचे सांगत हात वर केले, तर येथील माजी सरपंच नाना पाटील यांनी या महिलेने अंगावर रॉकेल नाही, तर पाणी ओतून घेतल्याचे तहसीलदारांना सांगितले. यामुळे परिस्थिती चिघळली. तसेच, घरांचे दरवाजे उघडून रहिवाशांना बाहेर काढत असताना, येथील एका वृद्धेला हृदयविकाराचा झटका आला. पोलिसांच्या वाहनातून या वृद्धेस लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. मात्र, वृद्धेचे प्रकृती नाजूक असल्याने तिला पुढील उपचारासाठी बारामती येथे दाखल करण्याच्या सूचना येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केल्या; मात्र उपचारास पैसे नसल्याने या वृद्धेचे कुटुंबीय हतबल झाले. वालचंदनगर-अंथुर्णे रस्त्यालगत शिंदेमळा येथे ७ हेक्टर ९८ आर क्षेत्र आहे. याठिकाणी काही रहिवाशांना ग्रामपंचयतीने घरकुल मंजूर केले आहे. सुमारे २५० कुटुंबे याठिकाणी राहतात. आर्थिक परिस्थीती बेताची असल्याने येथील बहुतेक कुटुंबांचा उदरनिर्वाह हा मजुरीवरच चालतो. सहा महिन्यांपूर्वी अंथुर्णे ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यानंतर शिंदेमळा येथील अतिक्रमांसंदर्भात ग्रामपंचायतीने इंदापूर न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने येथील अतिक्रमणे काढण्याचे निर्देश दिले; मात्र येथील रहिवाशांना यासंदर्भात महस३ल विभागाच्या नोटिसा आल्या नाहीत. केवळ ग्रामपंचायतीने त्याबाबतच्या तीन नोटिसा येथील रहिवाशांना पाठवल्या होत्या. या वेळी पोलिसांनी घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतुक केले. (वार्ताहर)राजकीय आकसापोटी आमचा बळी : आमदारांच गाव असूनही अन्याय1‘आमदारांचे गाव असताना आमच्यावर अन्याय होतो. राजकीय आकसापोटी आम्हा गोरगरिबांचा बळी दिला जात आहे. बारामती-इंदापूर रस्त्याकडेने धनदांडग्यांच्या इमारती अतिक्रमणांमध्ये आहेत; मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अधिपत्याखाली येथील ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी असे बेताल वागत असताना, त्यांना आमदारांनी समज का दिली नाही,’ अशी चर्चाही येथे रंगली होती. 2‘गोरगरिबांवर अन्याय करता; कारवाई ग्रामपंचायतीची आहे, तर तहसीलदार येथे कशाला आलेत?’ अशा शब्दांत रहिवाशांनी तहसीलदारांना फैलावर घेतले. जवळपास हजाराच्यावर जमलेल्या ग्रामस्थांपुढे तहसलीदारांची भंबेरी उडाली आणि त्यांनी अतिक्रमण ठिकाणावरून निघून जाणे पसंत केले. यानंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीदेखील येथून पळ काढला.