शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 02:08 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उन्नती प्रकल्प राबविणे, विद्यार्थ्यांना आरोग्य विमा योजना राबविणे, असे विषय शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी उन्नती प्रकल्प राबविणे, विद्यार्थ्यांना आरोग्य विमा योजना राबविणे, असे विषय शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत.महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर देण्यात येणार आहे. महापालिकेत नव्याने स्थापन झालेल्या शिक्षण समितीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या शिक्षण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोनाली गव्हाणे होत्या. महापालिका शाळांतील शिक्षण अध्ययन स्तर निश्चित करण्यात आला आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांशी पत्रव्यवहार केला.सोनाली गव्हाणे म्हणाल्या, ‘‘महापालिकास्तरीय शिक्षण परिषद झाली. महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते असा सर्वसाधारण समज दूर करत अध्ययन स्तर निश्चित करण्यात आला. यानुसार पहिली ते आठवीच्या प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार लेखन, वाचन आदींची माहिती असावी यानुसार काही निकष ठरवण्यात आले. या निकषांच्या आधारे प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांची प्रगती निश्चित करण्यात आली. विद्यार्थी अप्रगत असतील तर मात्र अशा शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटीस देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी गुणवत्ता तपासणी पथक तयार केले जाणार आहे. यात सेवानिवृत्त शिक्षकांचा समावेश राहणार आहे.’’तसेच समितीच्या बैेठकीतील विषय पत्रिकेवर विषय नव्हते. ऐनवेळी विषय मंजूर करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा काढणे, चºहोलीतील पंडित जवाहरलाल नेहरू शाळा, वडमुखवाडी शाळा, रावेत, पुनावळे, ताथवडे येथील शाळांसाठी बससुविधा उपलब्ध करून देणे़ आदी विषयांचा समावेश होता़