शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणीनंतर संस्थांचा असहकार

By admin | Updated: May 10, 2017 04:01 IST

उपनिबंधक कार्यालयात सहकारी संस्थेची नोंद केली जाते. मात्र, काही सहकारी संस्था पत्त्याच्या ठिकाणावरच आढळत नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : उपनिबंधक कार्यालयात सहकारी संस्थेची नोंद केली जाते. मात्र, काही सहकारी संस्था पत्त्याच्या ठिकाणावरच आढळत नाहीत. अशा सहकारी संस्थांचे कामकाज होते की नाही याबाबत खात्री नसते. यामुळे अशा संस्था केवळ नोंदणीपुरत्याच नावारूपाला येतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही लोक एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन केली जाते. त्यावर उपनिबंधकांचे नियंत्रण असते. संस्थांचे कामकाज सुरु राहण्यासह त्यांच्या वेळोवेळी मीटिंग, कागदपत्रांचे अपडेट असणे आवश्यक असते. मात्र, अनेक संस्थांचे कामकाजच बंद असल्याचे आढळून येत आहे. शिवाय त्यांचे कार्यालयदेखील सापडत नाहीत अशी स्थिती आहे. पिंपरीतील उपनिबंधक कार्यालयाकडून अशा संस्थांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कामकाज बंद असणाऱ्या आणि पत्ता न सापडणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरीतील उपनिबंधक कार्यालयाकडून २२५४ पैकी २०१५-१६ या आर्थिक वर्षात ९५ सहकारी संस्थांची, तर या आर्थिक वर्षात आणखी ४० संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. नोंदणी रद्द केलेल्या सहकारी संस्थांंमध्ये औद्योगिक, स्वयंरोजगार, ग्राहक, सेवक पतसंस्थांचा समावेश आहे. दोन वर्षांपूर्वी शहरातील सर्व संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये पत्ता न सापडणाऱ्या संस्थांचा शोध घेण्यात आला होता. दप्तरी नोंद असणाऱ्या पत्त्यांवर त्यांना नोटीस पाठविण्यात आली होती. तसेच खात्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन शोधही घेतला. मात्र, त्या ठिकाणी संस्था आढळून आल्या नाहीत. अखेर त्या संस्थांची नोंदणी रद्द केली.