शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

महागाईच्या झळा श्वान संतती नियमनाला, पशूवैद्यकीय विभाग : एका प्राण्यासाठी ६४९ रुपयांचा खर्च ६९३ रुपयांवर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 03:50 IST

भटकी, मोकाट कुत्री पकडून त्यांच्यावर संतती नियमनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने तीन संस्थांना ठेका दिला आहे. महागाईचा फटका कुत्र्याच्या संतती नियमनाला बसला आहे. एका कुत्र्याच्या शस्त्रक्रियेसाठी पूर्वी ६४९ रुपये खर्च येत असे. आता तो ६९३ रुपयांवर पोहोचला आहे.

पिंपरी : भटकी, मोकाट कुत्री पकडून त्यांच्यावर संतती नियमनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने तीन संस्थांना ठेका दिला आहे. महागाईचा फटका कुत्र्याच्या संतती नियमनाला बसला आहे. एका कुत्र्याच्या शस्त्रक्रियेसाठी पूर्वी ६४९ रुपये खर्च येत असे. आता तो ६९३ रुपयांवर पोहोचला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातर्फे भटक्या, मोकाट कुत्र्यांच्या संततीला रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. महापालिकेबरोबरच अनेक अशासकीय संस्थांच्या माध्यमातून कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी योजना, उपक्रम राबविले आहेत. मार्च २०१४ ते एप्रिल २०१७ या कालावधीत पीपल फॉर अ‍ॅनिमल, पुणे आणि सोसायटी फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन, कोल्हापूर या दोन संस्थांच्या माध्यमातून हे काम करण्यात आले. त्यामध्ये भटकी, मोकाट कुत्री पकडणे, त्यांच्यावर संतती नियमनाची शस्त्रक्रिया करणे, रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे, अशा कुत्र्यांना सांभाळणे, खावटी पाणी देणे, स्वच्छता ठेवणे आणि शस्त्रकियेनंतर त्यांना पुन्हा मूळ जागी नेऊन सोडणे आदी कामांचा समावेश आहे. त्यासाठी आवश्यक साहित्य, औषधे, मनुष्यबळ, वाहनव्यवस्था, इंधन आदीसाठी येणारा खर्च ठेकेदार संस्थांद्वारे करण्यात येतो.या दोन्ही संस्थांचा कालावधी एक-एक वर्षाचा होता. त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिल्यानंतर ही मुदतही नुकतीच संपली आहे. तरीही त्यातील पीपल फॉर अ‍ॅनिमल या संस्थेला पुढील निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन संस्थांची निवड होईपर्यत अर्थात दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे. मात्र, महापालिकांच्या प्रभाग कार्यालयांची वाढती संख्या लक्षात घेता आता तीन नवीन अशासकीय संस्थांना या कामाचा ठेका देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठीची निविदा प्रसिद्ध केली आहे. या तीन संस्थांद्वारे एका वर्र्षभरात २१ हजार कुत्र्यांवर संतती नियमनाच्या शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठेवले.तीन वर्षांत ३९ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरणमार्च २०१४ ते एप्रिल २०१७ या कालावधीत पीपल फॉर अ‍ॅनिमल, पुणे आणि सोसायटी फॉर अ‍ॅनिमल प्रोटेक्शन, कोल्हापूर या दोन संस्थांच्या माध्यमातून ३८ हजार ९८७ कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये २०१४-१५ मध्ये १० हजार १६३, २०१५-१६ मध्ये १४ हजार ५६९, तर सन २०१६-१७ मध्ये १४ हजार २५५ कुत्र्यांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यासाठी अनुक्रमे ६९ लाख ७५७ रुपये, १ कोटी ९ लाख ५५ हजार ५२३ आणि ८७ लाख १९ हजार ३१५ रुपये असा २ कोटी ६५ लाख ७५ हजार ५९५ रुपये खर्च आला आहे.