शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिकनगरीमधील नाट्यगृहे होणार आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:22 IST

महापालिका : बुकिंगसाठी नवीन संगणकप्रणाली तयार करण्याच्या हालचाली

पिंपरी : महापालिका क्षेत्रात असणाऱ्या नाट्यगृहांच्या तारखांवरून वाद होत असतात. ते टाळण्यासाठी नाट्यगृह बुकिंगमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न केले जाणार असून, आॅनलाइन बुकिंग करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे नाट्यगृहांच्या तारखांचा काळाबाजार थांंबणार आहे. नाट्यगृहांच्या आरक्षणाच्या तारखा आॅनलाइनद्वारे देण्याबाबत अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी पुढाकार घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, भोसरीत कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, पिंपळे गुरव येथे नटवर्य निळू फुले सभागृह, संत तुकारामनगर येथे आचार्य अत्रे सभागृहे आहेत. तसेच प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहाचे काम सुरू आहे. नाटकांचे प्रयोग, सांस्कृतिक कार्यक़्रम, स्रेहसंमेलने, राजकीय सभा, संमेलने, संगीत महोत्सव, व्याख्याने यासाठी नाट्यगृहे आणि सभागृहे भाड्याने दिले जातात. चिंचवड आणि पिंपरीत नाट्यप्रयोगांचे प्रमाण अधिक असते, तर विविध कार्यक्रमांसाठी आचार्य अत्रे आणि प्रा. मोरे सभागृहाला अधिक मागणी असते. त्यामुळे तारखावरून वाद होण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. तसेच तारखा विकण्याचा धंदाही काही व्यवस्थापनांनी सुरू केल्याचे उघड झाले होते. तसेच राजकीय आणि प्रशासकीय वजन वापरून तारखा फिरविण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे निर्मात्यांना त्रास झाला होता.समस्यांचा पाढा वाचलाचिंचवडच्या प्रा. मोरे नाट्यगृहाचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे, तर पिंपरीतील अत्रे सभागृहाचे काम सुरू आहे. प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहांचे काम रखडले आहे. त्याकडे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांचे लक्ष नाही. नाट्यगृहांच्या प्रश्नाबाबत अतिरिक्त आयुक्त यांनी प्रभागस्तरीय अधिकारी आणि कर्मचाºयांची बैठक घेतली. त्या वेळी अधिकाºयांनी समस्यांचा पाढा वाचला. नाट्यगृहामधील अपूर्ण स्थापत्य कामे, स्वच्छता आणि बुकिंगच्या तारखांविषयी चर्चा झाली.या वेळी चिंचवड येथील नाट्यगृहाचे काम झाल्यानंतर राडारोडा पडून आहे, तसेच स्वच्छतागृहातील अस्वच्छता या विषयीही सूचना केल्या.