शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र पोलीस आयुक्तालय लाल फितीत, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; उद्योगनगरीत गुन्ह्यांची वाढली संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:55 IST

वाढती लोकसंख्या, तसेच गुन्हेगारी घटनांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता, पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र आयुक्तालय असावे, अशी गरज निर्माण झाली आहे. या मागणीचा रेटा वाढल्याने शासनाच्या गृहखात्याकडे प्रस्तावसुद्धा गेला आहे.

पिंपरी : वाढती लोकसंख्या, तसेच गुन्हेगारी घटनांमध्ये होत असलेली वाढ लक्षात घेता, पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र आयुक्तालय असावे, अशी गरज निर्माण झाली आहे. या मागणीचा रेटा वाढल्याने शासनाच्या गृहखात्याकडे प्रस्तावसुद्धा गेला आहे. पावसाळी अधिवेशनात विधानसभेत या मुद्द्यावर लक्ष्यवेधी मांडली गेली. गृह राज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांकडून तत्त्वत: मंजुरीच्या घोषणा झाल्या. मात्र राजकीय इच्छाशक्तीअभावी पाठपुरावा कमी पडला. त्यामुळे हा प्रस्ताव शासनाच्या लालफितीच्या कारभारात अडकला आहे.महापालिका निवडणुकीला आठ महिन्यांचा कालावधी उलटला नाही, तोच राजकीय वैमनस्यातील गुन्हेगारी घटना वाढू लागल्या आहेत. माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाचा कट रचून अ‍ॅड. सुशील मंचरकर याने गुंडांना सुपारी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याच दिवशी दुपारी काळेवाडीत गोळ्या झाडून संतोष कुरवत याच्या खुनाचा प्रयत्न झाला. महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून तो निवडणूक रिंगणात होता. त्याच्यावरील हल्ल्याची घटना ताजी असताना दुसºयाच दिवशी भोसरी गवळीमाथा येथे विजय पांडुरंग घोलप या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. अगदी अलीकडच्या काळात सलग घडलेल्या या गोळीबाराच्या घटनांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे. गुन्हेगारी घटनांचा आलेख जसजसा वाढतो आहे, तशी नागरिकांमध्ये असुरक्षितता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे लवकरात लवकर शहरात पोलीस आयुक्तालय व्हावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.मागणीनुसार पुणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला. तो शासनाच्या गृहखात्यापर्यंत पोहोचला आहे. गृहखात्याकडे आलेल्या चार प्रस्तावांत पिंपरी-चिंचवडचा प्रस्ताव होता. मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी जाहीर केले. आयुक्तालयाबद्दल उपस्थित लक्ष्यवेधीवर अधिवेशनात चर्चा झाली. प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी अर्थ विभागाकडे पाठविला असून, लवकरच तो संमत होईल, असे उत्तर गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लवकरच स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासन दिले होते. स्वतंत्र आयुक्तालयाचा प्रस्ताव मार्गी लागण्यास मुहूर्त मिळणार कधी, असा सवाल उपस्थित होत आहेत.> भौगोलिक विस्तार वाढणारमनुष्यबळ आवश्यक असल्याने भरती प्रक्रिया करावी लागणार आहे. तसेच जागा, इमारत हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. अर्थखात्याची मंजुरी मिळाल्यास पुढील मार्ग सुकर होणार आहे. पोलीस आयुक्तालय होणार अशी घोषणा गेले अनेक वर्षे केली जात आहे. परंतु प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने नेमके आयुक्तालय कधी सुरू होणार,यासाठी राजकीय इच्छाशक्तीच कमी पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. आयुक्तालयाला मुहुर्त कधी याकडे लक्ष लागले आहे.