शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

थंडीमुळे सुका मेव्याच्या मागणीत झाली वाढ

By admin | Updated: November 16, 2016 02:25 IST

सध्या अनेक नागरिक काजू, बदाम, खारीक, मणुका आदी सुकामेवा खरेदी करण्यासाठी दुकानावर गर्दी करताना दिसून येत आहेत

रहाटणी : सध्या अनेक नागरिक काजू, बदाम, खारीक, मणुका आदी सुकामेवा खरेदी करण्यासाठी दुकानावर गर्दी करताना दिसून येत आहेत, तर इतर ऋतूंच्या तुलनेत सध्या मागणी वाढल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली. सुका मेव्याच्या किमतीही किलोमागे १00 ते ५00 रुपयांनी वाढल्या आहेत.हिवाळ्यात थंडीमुळे भूक लागते. पचनक्षमताही वाढते. म्हणून दैनंदिन आहारात स्निग्ध पदार्थ व प्रथिनांचे प्रमाण वाढविणे आवश्यक असल्याचे मत आहारतज्ज्ञ व्यक्त करतात. ऋतूनुसार आहारातही बदल करावा लागतो. स्थानिक बाजारपेठेत सुकामेव्याची दुकाने थाटलेली दिसत आहेत. यात गूळ, शेंगदाणे, खोबरे, तीळ हे पदार्थ विक्रीला आहेत. या वस्तूंच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अंजीर, बदाम, अक्रोड, पिस्ता, पेंडखजूर यापासून तयार लाडूंची मागणीही वाढल्याचे विक्रेते सांगतात. बाजारपेठेत सुका मेव्यापासून तयार केलेले लाडू विक्रीला उपलब्ध आहेत . पूर्वी असे लाडू घराघरांत आवर्जून केले जात होते. मात्र धावपळीच्या जमान्यात असे पदार्थ बनविण्यासाठी कोणालाही वेळ नसल्याने तयार केलेले असे पदार्थ विकत घेण्यास नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. पूर्वी हिवाळा म्हटला की घरातील तरुण मुले व्यायाम करण्यासाठी अगदी पहाटे आखाड्यात जात असत. घरी परतल्यानंतर सुकामेवा खुराक म्हणून खात असत. मात्र सध्या याउलट झाले आहे . तरुण वेळ मिळेल तेव्हा जीममध्ये जाऊन व्यायाम करीत असल्याने खुराकाचा प्रश्नच निकाली निघाला आहे. अनेक नागरिक हिवाळ्यात सुकामेव्याला महत्त्व देत आहेत. (वार्ताहर)