शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
3
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
4
तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
5
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
6
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
7
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
8
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
9
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
10
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
11
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!
12
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
13
Dombivli Crime: मोबाईलचा पासवर्ड बदलला, कुटुंबात राडा! आई, दोन्ही मुले, आजोबामध्ये तुंबळ हाणामारी
14
अमानुष! लेकीशी भांडण... सासरच्यांनी जावयाला विष पाजलं, पळवून पळवून मारलं; झाला मृत्यू
15
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
16
आंध्र प्रदेशात देवरगट्टू बन्नी उत्सवादरम्यान दोन जणांचा मृत्यू, ९० जण जखमी
17
Video: छातीत झाडल्या तीन गोळ्या, मित्राच्या हत्येचा बनवला व्हिडीओ; पोलिसांची उडाली झोप
18
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
19
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
20
Neena Kulkarni: ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचे विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!

सक्तीमुळे उत्पन्नात झाली वाढ; मंदीतही बांधकाम परवान्यातून उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 03:23 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करवसुलीवर भर दिला होता. मिळकत, पाणी आणि बांधकाम परवना विभागाने गेल्या वर्षांत दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले. महापालिका करवसुलीत अव्वल ठरली आहे. सुमारे तीन हजार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करवसुलीवर भर दिला होता. मिळकत, पाणी आणि बांधकाम परवना विभागाने गेल्या वर्षांत दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले. महापालिका करवसुलीत अव्वल ठरली आहे. सुमारे तीन हजार कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.महापालिकेची सूत्रे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वीकारताच करातून उत्पन्न वाढीकडे लक्ष दिले आहे. तसेच गतिमान प्रशासनासाठी प्रयत्न केले आहेत. मिळकत आणि पाणीपट्टीच्या थकीत करवसुलीसाठी प्राधान्य दिले आहे. तसेच वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या आणि दंवडीपिटणे, पथनाट्यांच्या माध्यमातून करवसुलीसाठी प्रयत्न केले आहेत. तसेच कारवाईचा बडगाही उघडल्याने मिळकतकराची विक्रमी वसुली झाली आहे. तसेच कर न भरण्याचे नळ जोड तोडणार असा इशारा दिल्याने मोठ्याप्रमाणावर वसुली झाली.भारतीय जनता पक्षाची महापालिकेत आल्यानंतर राज्य शासनाचे एक परिपत्रक प्रशासनास दिले होते. त्यात शंभर टक्के करवसुलीला प्राधान्य द्यावे, तसेच उपाययोजना कराव्यात यांसदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आयुक्तांनी प्रत्येक विभागांना पत्र पाठविले होते. त्यामुळे मिळकतकर, पाणीपट्टी वसुलीला प्राधान्य दिले होते. मिळकतकर विभागाने शहरातील सुमारे सव्वा लाख थकबाकीदारांना नोटिसा दिल्या होत्या.एलबीटी आणि मुद्रांक शुल्क, अनुदानातून महापालिकेला गेल्या वर्षी १४१० कोटी उत्पन्न मिळाले होते. यावर्षी १६२१ कोटी उत्पन्न मिळाले आहे. त्यात पावणे दोनशे कोटींची भर पडली आहे, अशी माहिती सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.- मिळकतकरातही भर पडली आहे. गेल्यावर्षी ४५० कोटी उत्पन्न मिळाले होते. यावर्षी ४८३.४६ कोटींची भर पडली आहे. ३३ कोटींनी उत्पन्न वाढले आहे. तसेच अवैध बांधकाम शास्ती वसुलीचे प्रमाणही वाढले आहे.- महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाचे उत्पन्नही यावर्षी वाढले आहे. रेरा आणि जीएसटीचा परिणाम असतानाही मोठ्याप्रमाणावर बांधकामे वाढल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते. या विभागास ४२० कोटी उद्दिष्ट होते. ४५५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. सुमारे पस्तीस कोटींची भर पडली आहे, अशी माहिती सह शहर अभियंता राजन पाटील यांनी दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड