शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

मिळकतकर बिल, नोटीस मिळणार एका क्लिकवर

By admin | Updated: September 25, 2015 01:05 IST

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सात प्रभागांतील सर्व ९०१३ मिळकतकराची चालू आर्थिक वर्षातील (२०१५-१६) बिले, तसेच मागील थकबाकीदारांना पाठविण्यात येणारी नोटीस बोर्डाच्या

किवळे : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील सात प्रभागांतील सर्व ९०१३ मिळकतकराची चालू आर्थिक वर्षातील (२०१५-१६) बिले, तसेच मागील थकबाकीदारांना पाठविण्यात येणारी नोटीस बोर्डाच्या संकेतस्थळावर बुधवारपासून उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना घरबसल्या एका क्लिकवर कर व थकबाकीच्या रकमेची माहिती मिळणार आहे. सोमवारपासून मिळकतकर बिले घरपोच वाटप सुरू करण्यात आले आहे. अनेकदा मिळकत कराची बिले वेळेवर मिळत नसल्या कारणाने बिले भरण्यास नागरिक टाळाटाळ करीत असतात. काम धंद्यानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्यांना बिले मिळण्यात अडचणी येत असतात. काही कॅन्टोन्मेंट बोर्ड, तसेच शेजारच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत यापूर्वीच मिळकतकराची व पाणीपट्टी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याने इंटरनेटच्या जमान्यात नागरिकांच्या दृष्टीने खूपच सोईचे झाले आहे. त्यामुळे बोर्ड प्रशासनाने संकेतस्थळावर मिळकतकराची बिले उपलब्ध करण्याबाबत गेल्या दोन वर्षांत ‘लोकमत’ने बातम्या प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता. चिंचोली येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब भेगडे, बाळासाहेब जाधव यांनी संकेतस्थळावर सर्व प्रकारची बिले उपलब्ध करण्याबाबत मागणी लावून धरली होती. बोर्डाच्या अधिकृत संकेत स्थळावर ँ३३स्र://६६६.ूुीिँ४१ङ्मं.िङ्म१ॅ गेल्यावर पहिल्या पानावर डाऊनलोड सदरात क्लिक केल्यावर मिळकतकर बिले २०१५-१६ हे शीर्षक दिसते. आंबेडकरनगर, भेगडेवाडी, चिंचोली, दत्तनगर, ईबीपी रोड, गांधीनगर, गार्डन सिटी, घोरवडी इंदिरानगर, किन्हई, कोटेश्वरवाडी, एम. बी. कॅम्प, मेन बाजार माळवाडी, मामुर्डी, परमार कॉम्प्लेक्स, पारशी चाळ, स्वामी विवेकानंद रोड, शेलारवाडी, शितळानगर, शिवाजीनगर, सिद्धिविनायकनगरी, सर्व्हे क्रमांक ४४१, ४४७ व झेंडेमळा असे भाग असून यातील आपणास हव्या असणाऱ्या भागाच्या नावावर क्लिक केल्यावर त्या भागातील सर्व मिळकतकर बिले समोर दिसतात. तसेच त्याखाली त्या भागातील मिळकतकराची थकबाकी सूचना (नोटीस) दिसत असून, त्यात विविध करांची थकबाकी, नोटीस शुल्क, व्याज आदी माहिती दिसत आहे.(वार्ताहर )