शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डासांच्या प्रादुर्भावाने धोका, महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 01:29 IST

पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले आहे. मोकळ्या जागांवर गवत वाढले आहे. पाऊस थांबल्याने या साचलेल्या पाण्यावर आणि गवतामुळे डासांची उत्पत्ती होत आहे.

जाधववाडी - पावसामुळे शहरात काही ठिकाणी पाणी साचले आहे. मोकळ्या जागांवर गवत वाढले आहे. पाऊस थांबल्याने या साचलेल्या पाण्यावर आणि गवतामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.याबाबत उपाययोजना करण्यात यावी, अशी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत आहे. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.शहरात काही ठिकाणी आजही उघडी गटारे आहेत. या गटारांमध्ये डासांची उत्पत्ती होत आहे. जाधववाडी परिसरातही अशीच परिस्थिती आहे. मोकळ्या जागांवर गवत वाढले आहे. ठिकठिकाणी डबकी साचली आहेत. त्यामुळे अशा अडगळींच्या ठिकाणी डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत आहे.नागरी वस्तीत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळी आणि सायंकाळी डासांचा त्रास वाढतो.पावसामुळे वाढलेले गवत व साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण अधिक वाढले आहे़ विशेषत: सकाळी व सायंकाळी डासांचा त्रास अधिक वाढतो.खबरदारी घेण्याबाबत उदासीनताशहरात आणि जाधववाडी परिसरातही डेंगी सदृश रुग्णही आढळले आहेत. घराघरांतील पाण्याच्या साठवण केलेल्या टाक्या, फ्रिजच्या मागील भागात साचलेले पाणी, वाहनांचे पंक्चर काढण्याकरिता साठवण्यात आलेले पाणी आदींबाबत खबरदारी घेण्यात येत नसल्याचे दिसून येते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याबाबत शहरात जनजागृती करणे आवश्यक आहे. मात्र काही भागातच ही जनजागृजी होत आहे. परिणामी अन्य भागातील नागरिकांमध्ये खबरदारी घेण्याबाबत उदासीनता दिसून येते.जुने टायर, भंगारामुळे डासोत्पत्तीकुदळवाडी परिसरात भंगार मालाची गोदामे आहेत. यात उघड्यावर भंगार ठेवण्यात आलेले असते. या भंगार वस्तूंमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. या भंगार वस्तूंमुळे अडगळीची ठिकाणे तयार होतात. ही अडगळीची ठिकाणे डासांची पैदास केंद्र ठरतात. या भागात टायर विक्रेतेही मोठ्या संख्येने आहेत. जुन्या टायरचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय या भागात मोठ्या प्रमाणात होतो. असे टायर गोदामात आणि रस्त्याच्याकडेला उघड्यावर ठेवलेले असतात.नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नजाधववाडी परिसरात यंदा पंधरा ते वीस डेंगी सदृश रुग्ण तर अनेक जण विविध प्रकारच्या तापाने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. परिसरात तसेच कुदळवाडी भंगार वस्त्यातील नागरिकांना डासांच्या प्रादुर्भावामुळे त्रास सहन करावा लागत आहे. पालिका प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.भंगार व्यावसायिकांमध्ये जागृती हवीकुदळवाडीतील भंगाराच्या व्यावसायिकांमध्ये जागृतीची गरज आहे. भंगार वस्तू कशा पद्धतीने ठेवाव्यात, गोदाम बंदिस्त असावे, पावसाचे पाणी साचू नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात, अडगळीची ठिकाणे शोधून तेथे औषध फवारणी करावी आदींबाबत या व्यावसायिकांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कुदळवाडी भागात विशेष उपक्रम राबविला पाहिजे.औषध, धूर फवारणीची मागणीडासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेतर्फे औषध आणि धूर फवारणी करण्यात येत आहे. मात्र काही मोजक्याच भागात ही उपाययोजना करण्यात येत आहे. दाट वस्तीत डासांचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र मोकळ्या जागांवर औषध फवारणी होत असल्याचे दिसून येत नाही. मोकळ्या जागांवरही धूर फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या