शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड शहराला यंदा देशात 24 तर राज्यात सातवा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 14:47 IST

मागील वर्षी पिंपरी शहराचा देशात 52 तर राज्यात 13 वा क्रमांक आला होता...  

पिंपरी :  मागील तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात पिछाडीवर जात असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची यंदा सर्वेक्षणात सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराचा देशात 24 वा क्रमांक आला आहे. तर, राज्यात पिंपरी शहर पहिल्या दहामध्ये आले असून सातवा क्रमांक आला आहे. सर्वेक्षणाचा  गुरुवारी निकाल जाहीर झाला आहे. याबाबतची माहिती मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली. दरम्यान, मागील वर्षी देशात 52 तर राज्यात 13 वा क्रमांक आला होता.  

व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये घेणे व याकरिता त्यांच्यामध्ये माहिती, शिक्षण व संवादाद्वारे  साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू होता. केंद्र सरकारने मागील वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षणात बदल केले होते. स्वच्छ सर्वेक्षण वर्षातून एकाचवेळी करण्याचे बंद केले. त्याऐवजी तीन टप्प्यात सर्वेक्षण केले जाते. पहिल्या लीगमध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा सहावा तर दुस-या लीगमध्ये 14 वा क्रमांक आला होता. आता या अभियानाचा अंतिम निकाल लागला आहे. त्यात शहराची सुधारणा झाली आहे.  देशात 24 वा तर राज्यात सातवा क्रमांक आला आहे. मागील तीन वर्षाच्या तुलनेत शहराची मोठी सुधारणा झाली आहे. 

पालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले, ''आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळेच 52 वरुन शहराचा नंबर 24 वर आला आहे. तर, राज्यात सातवा क्रमांक आहे. स्टार रेटिंग मिळाले नाही. त्यात 600 मार्क कमी पडले. ते  मिळाले असते तर शहर 15 व्या नंबरवर आले असते. पुढच्यावर्षी दहाच्या आतमध्ये आणण्यासाठी आरोग्य विभागाचा प्रयत्न असणार आहे''. ..... असा वाढला आलेख2016 मध्ये स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहर टॉप 10 मध्ये होते. शहराचा 9 वा क्रमांक आला होता. तर, महाराष्ट्रातून 1 नंबर आला होता. 2017 पासून त्यात घसरण सुरु झाली होती. 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड शहर पिछाडीवर गेले. 9 व्या क्रमांकावर असलेले पिंपरी-चिंचवड शहर थेट 72 व्या नंबरवर फेकले गेले होते. तर, 2018 मध्ये देशात 43 वा क्रमांक आला होता. तर, राज्यात सहावा क्रमांक होता. 2019 मध्ये पुन्हा त्यामध्ये घसरण झाली होती. शहराचा देशात 52 वा तर राज्यात 13 वा क्रमांक आला होता. यावेळी 2020 मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात शहराची सुधारणा झाली आहे. देशात 24 वा तर राज्यात सातवा क्रमांक आला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानshravan hardikarश्रावण हर्डिकर