शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

विकास आराखड्याची हवी अंमलबजावणी

By admin | Updated: March 30, 2017 02:14 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या जनतेने भारतीय जनता पक्षाच्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या जनतेने भारतीय जनता पक्षाच्या हाती एकहाती सत्ता दिली आहे. त्यामुळे विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. शहरातील पायाभूत सुविधा सक्षम करण्याबरोबरच शहर विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविणार आहोत. विकास आराखडा जाहीर केल्यानंतर त्यातील आरक्षणांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यास नियोजित विकासाचे ध्येय साध्य करता येते. रस्ते, उद्याने, बाजारपेठा, शाळा, दवाखाने ही आरक्षणे विकसित केल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल. नगरनियोजन आणि अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तेव्हाच स्मार्ट सिटीचे स्वप्न साकार हाईल. अत्यंत वेगाने विकसित होणारे शहर म्हणजेच पिंपरी-चिंचवड हे शहर अत्यंत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लोकसंख्यावाढीचा आलेख पाहता भविष्यात शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी, प्रशासनाने व्यापक प्रयत्न करण्याची गरज आहे. आज शहराची लोकसंख्या २० लाखांवर जाऊन ठेपली आहे. पुढील १० ते २० वर्षांत ही लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांचा कालखंड डोळ्यासमोर ठेऊन पिंपरीचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. इतर शहरांची तुलना करायची झाल्यास आपले शहर स्मार्ट, सुंदर आहे, यात शंकाच नाही. येथील प्रशस्त रस्ते, झालेला सर्वांगीण विकास देदीप्यमानच आहे. हे शहर आणखी चांगले करण्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न, जनतेचा सहभाग आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवडमधील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व भाजपाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे महापालिकेत भाजपाची सत्ता आली आहे. नागरिकांनी मोठ्या विश्वासाने आपल्या हाती सत्ता दिली आहे. त्यामुळे विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.निगडी ते दापोडी, रावेत ते औंध हा रस्ता आणि बोपोडी ते वाकडेवाडी, औंध पूल ते परिहार चौक येथील रस्ता या मार्गावर वाहतुकीवर ताण येतो. औंध पुलापर्यंत आणि बोपोडी पुलापर्यंत येणाऱ्या माणसाला पुण्याकडील पुढील प्रवास नकोसा वाटतो. त्याचबरोबर हिंजवडी ते जगताप डेअरी, हिंजवडी ते थेरगाव या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांना कोंडीचा त्रास होतो. यावरही उपाययोजना करायला हवी. जलद प्रवासासाठी मेट्रो हवीचहिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोबरोबरच हिंजवडी ते चाकण असा मेट्रोचा मार्ग तयार करायला हवा. त्यातून जलद प्रवास करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर मेट्रो सेवा सुरू करताना प्रवाशांच्या आर्थिक गणिताचाही विचार केला जावा. हा प्रवास सामान्यांच्या खिशाला परवडणारा असावा. पिंपरी-पुणे हा मेट्रो मार्ग प्रस्तावित केला आहे. त्याचबरोबर चाकण-हिंजवडी असा मार्गही तयार करण्याची गरज आहे. पिंपरीपर्यंतची मेट्रो निगडीपर्यंत न्यावी, अशी आमची मागणी आहे. तसेच विकास आराखड्यात रिंगरोड प्रस्तावित आहे. त्याचबरोबर भक्ती-शक्ती चौकाजवळील उड्डाणपूल पुढे स्पाइन रस्त्यामधील अडथळा दूर होऊन हा रस्ता थेट चऱ्होलीपर्यंत जोडला जाणार आहे. अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नाबाबत राज्यशासनाने न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केले. शास्तीबाबतही नागरिकांना सूट दिली आहे.

लक्ष्मण जगताप(लेखक चिंचवडचे आमदार असून, भाजपाचे शहराध्यक्ष आहेत.)