शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

चाळकवाडी टोलवर अवैध वसुली सुरूच

By admin | Updated: June 12, 2017 01:19 IST

पुणे जिल्ह्यात नोंदणी झालेल्या व्यावसायिक वाहनांसाठी टोलमधून ५० टक्के सवलत आहे़ ही सवलत वाहनांना द्यावी व तत्काल दुरुस्ती फलक लावावा

लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : पुणे जिल्ह्यात नोंदणी झालेल्या व्यावसायिक वाहनांसाठी टोलमधून ५० टक्के सवलत आहे़ ही सवलत वाहनांना द्यावी व तत्काल दुरुस्ती फलक लावावा, असे आदेश भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देऊनही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत चाळकवाडी येथील टोलनाक्यावर १०० टक्के टोलवसुली सुरूच आहे. गेल्या तीन महिन्यांहून अधिक कालावधीपासून टोलवर वाहनचालकांची लूट होत आहे़ वाहनचालकांची फसवणूक करून १०० टक्के रक्कम वसूल करत असल्याचे वृत्त दि़ ११ मे २०१७ रोजी दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते़ या वृत्ताची दखल घेऊन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक सुमित मुखर्जी यांनी टोलधारक कंपनीचे उपाध्यक्ष यांना करारातील दरानुसार टोल दुरुस्ती करून आकारणी करण्यात यावी व लावण्यात आलेल्या फलकामध्ये दुरुस्ती करण्यात यावी, असा आदेश दिला होता. कंपनीनेदेखील दोन दिवसांत दुरुस्ती फलक लावण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र, या घटनेला २३ दिवस उलटूनही अद्याप दुरूस्ती फलक लावण्यात आलेले नाहीत़ खेड ते सिन्नर दरम्यान चाळकवाडी व हिवरगाव पावसा येथे टोलनाके सुरू करण्यात आले आहेत़ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या वतीने खेड-सिन्नस एक्सप्रेस लि़ मधील चाळकवाडी व हिवरगाव पावसा येथे टोलनाका सुरू करण्यासंदर्भात अधिसूचना जाहीर करून वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली़़अधिसूचना व वृत्तपत्रानुसार पुणे जिल्ह्यातील नोंदणीकृत असलेल्या व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सवलत टोलमधून देण्यात आली आहे़ त्यानुसार चाळकवाडी टोलनाक्यावर पुणे जिल्ह्यातील एम़ एच़ १४, एम़ एच़ १२ व एम़ एच़ ४२ या वाहनांना ५० टक्के सवलत टोलमधून मिळणे अपेक्षित होते़ मात्र टोलनाक्यावर १०० टक्के टोल घेण्यात येत होता़ चाळकवाडी येथे लावण्यात आलेल्या फलकामध्ये सवलतीचा उल्लेख नसल्याने व गेल्या तीन महिन्यांहून अधिक कालावधीपासून सवलत न देता वसुली सुरू असून वाहनचालकांची फसवणूक होत असून, याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे़