शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमी स्वच्छतेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: May 9, 2017 03:41 IST

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमध्ये साफसफाई करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूगाव : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमध्ये साफसफाई करण्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. स्मशानभूमीसाठी कायमस्वरूपी सफाई कामगार, रखवालदार (सुरक्षारक्षक) नेमावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.येथे इंद्रायणी नदीच्या काठावर सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. सरणाच्या बेडजवळ जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या नाहीत. संरक्षक भिंतीवरील धोकादायक सळया कापलेल्या नाहीत. रंगकामही केलेले नाही. दोन महिन्यांतच शेडच्या लोखंडी पत्र्याला गंज लागण्यास सुरवात झाली आहे. अंत्यविधीसाठी आणलेला मृतदेह घाणीमध्येच ठेवावा लागतो अथवा उपलब्ध साधनांनी सफाई करून घ्यावी लागते. ग्रामपंचायतीने सफाई कर्मचारी नेमला नसल्याने स्मशानभूमीची साफसफाई होत नसल्याने अंत्यविधीचे साहित्य, कचरा कायम दिसून येतो. एखादा गावकारभारी अथवा गावातील राजकीय व्यक्तीच्या घरातील व्यक्तीचा अंत्यविधी असल्यास ग्रामपंचायतीमार्फत तातडीने साफसफाई केली जाते. या स्मशानात सर्वांनाच अंत्यविधीसाठी यावे लागत असताना हा भेदभाव का, ही स्मशानभूमी फक्त प्रतिष्ठितांसाठीच आहे काय, असा सवालही केला जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत तातडीने दखल घेऊन स्मशानभूमीची नियमित साफसफाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने हा भेदभाव संपुष्टात आणून येथे कायमस्वरूपी सफाई कामगार नेमावा. याबाबत राजाराम गोविंद काळोखे म्हणाले, की येथे कायमस्वरूपी रखवालदार व सफाई कामगारांची नेमणूक करावी अशी ग्रामस्थांची माफक अपेक्षा आहे. स्मशानभूमी ही सर्वांसाठी असून येथे भेदभाव करू नये. येथून पुढे स्मशानभूमीची नियमित स्वच्छता व्हावी.