शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘अज्ञाना’वरून खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:57 IST

स्मार्ट सिटी बैठक : विरोधी पक्षनेते अन् आयुक्तांमध्ये जुंपली

पिंपरी : स्मार्ट सिटी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सल्लागार समिती निर्माण केली आहे. स्मार्ट सिटीची पहिली बैठक महापालिका भवनातील आयुक्त दालनात झाली. त्या वेळी ‘अज्ञान’ या शब्दावरून आयुक्त श्रावण हर्डीकर आणि विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या खडाजंगी झाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते बैठकीतून निघून गेले.

महापालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील आयुक्त दालनात स्मार्ट सिटीसाठी निर्माण केलेल्या विविध संस्थांच्या सल्लागार समितीची पहिलीच बैठक झाली. त्यात स्मार्ट सिटीबाबत सादरीकरण करण्यात आले. शहर वायफाय करणे आणि नेटवर्किंग विषयाची माहिती दिली.या विषयाची माहिती प्रशासनाच्या वतीने दिली. केंद्र सरकारच्या मदतीने सौर ऊर्जेचा वापर वाढविणे याबाबत माहिती देण्यात आली. शहरातील दोन ठिकाणी असणाºया महापालिका इमारतींवर महापालिकेच्या खर्चाशिवाय सोलर पॅनल बसविण्यात येणार आहेत. त्यातून मिळणारी वीज महापालिकेस वापरण्यात मिळणार आहे. साडेतीन रुपये प्रती युनिट दराने मिळणार आहे, असे सांगितले. त्यावर विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, ‘‘महापालिकेच्या वतीने वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पातून मिळणारी वीज आपण साडेपाच रुपये दराने खरेदी करणार आहोत आणि दुसºया ठिकाणी सोलरमधून मिळालेली साडेतीन रुपये दराने घेणार आहोत. अशी तफावत का?’’ त्यावर आयुक्त म्हणाले, की दोन वेगवेगळे विषय आहेत. प्रकल्प वेगवेगळे आहोत, विषय मिक्स करू नका. त्यावर विरोधी पक्षनेते म्हणाले, ‘‘विषय वीज खरेदीचाच आहे. दरात तफावत का? असा आमचा प्रश्न आहे.’’ त्यावर याविषयीचे तुमचे ‘अज्ञान’ आहे, असे आयुक्तांनी उत्तर दिले. त्यामुळे अज्ञान या शब्दावरून विरोधी पक्षनेते चिडले. ‘आमचे अज्ञान आहे. ही आपली भाषा आहे का? आपण जनतेचे सेवक आहात. आपणाकडून ही अपेक्षा नाही. आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत. आम्हाला पडणाºया प्रश्नांची उत्तरे मिळायलाच हवीत, असे साने म्हणाले.शाब्दिक चकमककाही काळ दोघांमध्ये शाब्दिक कलगी-तुरा सुरू होता. अचानक घडलेला हा प्रकार पाहून बैठकीस खासदार आणि आमदारांसह सर्वच जण अवाक् झाले. त्या वेळी असे म्हणण्याचा उद्देश नव्हता, आपण बैठक पुढे नेऊ, असा खुलासा आयुक्तांनी केला. मात्र, विरोधी पक्षनेते ऐकायला तयार नव्हते. ‘आम्हाला उत्तरे मिळणार नसतील तर बैठकीला थांबून काय फायदा, असे म्हणत चिडून ते बैठकीतून बाहेर पडले. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे