शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आधार असल्यास साक्षीदारांची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 03:26 IST

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या माध्यमातून घर व जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या खरेदीदार व विक्रेत्याकडे आधारकार्ड असल्यास आता साक्षीदाराची गरज भासणार नाही. मुद्रांक शुल्क विभागाकडून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.

पुणे - नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या माध्यमातून घर व जमीन खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या खरेदीदार व विक्रेत्याकडे आधारकार्ड असल्यास आता साक्षीदाराची गरज भासणार नाही. मुद्रांक शुल्क विभागाकडून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयात दस्तनोंदणी करणाºयांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाकडे राज्यातील दुसºया क्रमांकाचे महसूल देणारा विभाग म्हणून पाहिले जाते. त्यामुळे नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे केला जात आहे.सध्यस्थितीत मालमत्ता खरेदी-विक्री करताना दुय्यम उपनिबंधकासमोर साक्षीदाराची कागदोपत्री संपूर्ण माहिती घेणे, त्यांच्या अंगठ्याचे ठसे, फोटो, हमीपत्र, स्वाक्षरी अशी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. साक्षीदार नसल्यास खरेदी-विक्री व्यवहार करणे शक्य होत नाही. त्यामुळे साक्षीदार हा या प्रक्रियेमधील सर्वांत महत्त्वाचा दुवा मानला जातो. परंतु, केंद्र शासनाने प्रत्येक विभागात आधारकार्ड अनिवार्य केल्याने संबंधित व्यक्तीची पडताळणी व प्रमाणीकरण करणे सोपे झाले आहे.त्यामुळे आधारकार्ड असलेल्या साक्षीदाराची आवश्यकता असू नये, या मुद्रांक शुल्क विभागाने राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे. परिणामी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या कामकाजात सहजता येणार आहे.केंद्र शासनाने सर्व शासकीय कामकाजातील कागदोपत्री व्यवहारात आधार क्रमांक अनिवार्य केला आहे. त्याचप्रमाणे विविध विभागांच्या सेवांसंदर्भात आधार क्रमांक जोडणी अनिवार्य केली आहे. परिणामी मूळ व्यक्तीची सत्यता पडताळणे सोपे झाले आहे. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही यंत्रणा कार्यान्वित करून नागरिकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.- सुप्रिया करमरकर-दातार,उपमहानिरीक्षक, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डPuneपुणे