शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘संतभूमी’ ओळख राहावी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2015 04:29 IST

राजकारणात गुन्हेगारीचा शिरकाव झाला असून, त्याला राजाश्रय मिळाला आहे. महापालिकेत, तसेच शहरातील सहकारी संस्थांमध्ये विश्वस्त म्हणवून घेणारेच

पिंपरी : राजकारणात गुन्हेगारीचा शिरकाव झाला असून, त्याला राजाश्रय मिळाला आहे. महापालिकेत, तसेच शहरातील सहकारी संस्थांमध्ये विश्वस्त म्हणवून घेणारेच जर गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतील, तर जनतेच्या प्रश्नांबद्दल, विकासाबद्दल त्यांना तळमळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.संत ज्ञानेश्वरमहाराजांचे संजीवन समाधिस्थळ आळंदी, जगद्गुरू संत तुकोबाराय यांची जन्मभूमी श्रीक्षेत्र देहू तसेच, महान गणेशभक्त मोरया गोसावी यांचे संजीवन समाधिस्थळ चिंचवड, अशा संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत गुन्हेगारीचे होणारे उदात्तीकरण वेळीच रोखले पाहिजे. संतभूमीची आणि श्रमिकांच्या कष्टाने विकसित झालेल्या या उद्योगनरीची ओळख पुसली जाऊ नये, याची दक्षता घेतली गेली पाहिजे.अल्पावधीत झपाट्याने झालेल्या औद्योगिकीकरणामुळे शहराचा विकास झाला. कष्टकरी, श्रमिकांची ही नगरी औद्योगिकनगरी म्हणून ओळखली जाऊ लागली. पोटाची खळगी भरण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक या ठिकाणी एकरूप झाले. विविध जाती-धर्म-पंथांचे नागरिक येथे गुण्यागोविंदाने राहत आहेत. देशाच्या आणि जगाच्या नकाशावर स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या या औद्योगिकनगरीला गुन्हेगारीचे ग्रहण लागले आहे. केवळ राजकारणातच नाही, तर औद्योगिकक्षेत्रातही गुन्हेगारीने शिरकाव केला आहे. संघटित, असंघटित कामगारांचे नेतृत्व करण्याचा बहाणा करून उद्योजकांकडून खंडणी वसुली करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात गुन्हेगारी टोळ्यांनी शिरकाव केला आहे. त्याची झळ कामगारांनाही सोसावी लागत आहे. कामगारांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्यात वाद-विवाद होऊ लागले आहेत. खून, मारामाऱ्या अशा गंभीर घटना घडत आहेत. औद्योगिक शांततेला बाधा पोहोचू लागली आहे. संतभूमी आणि उद्योगनगरी अशी ओळख कायम जपण्याची जबाबदारी राजकीय पक्षांचे प्रमुख नेते, तसेच मतदार म्हणून हक्क बजावणारे या सुजाण नागरिक यांच्यावरच आहे.निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले विविध पक्षांचे उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतील, तर त्यांना टक्कर देण्यास कोणी सज्जन उमेदवार रिंगणात थांबणार नाही. थांबला, तरी साम, दाम, दंड, भेद नीती तंत्रापुढे त्याचा टिकाव लागत नाही. (समाप्त)