शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

‘पवनामाई’ अभियानातील नारीशक्तीचा सन्मान, विश्वसुंदरी युक्ता मुखीच्या हस्ते नदीची आरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 01:46 IST

रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी व कनेक्टिंग एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमाने जलपर्णीमुक्त व सांडपाणी विरहित पवनामाई अभियानात सक्रिय सहभाग आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला.

रावेत -  रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी व कनेक्टिंग एनजीओ यांच्या संयुक्त विद्यमाने जलपर्णीमुक्त व सांडपाणी विरहित पवनामाई अभियानात सक्रिय सहभाग आणि पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला. विश्वसुंदरी युक्ता मुखी, पर्यावरणतज्ज्ञ केतकी घाटे व मानसी करंदीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पवनामाईची आरती करण्यात आली. तसेच निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या ४२ महिलांचा या वेळी सत्कार करण्यात आला.रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णीमुक्त स्वच्छ व सुंदर सांडपाणी विरहित पवनामाई, पवनेचा उगम ते संगम अशा अभियानांतर्गत शहरातील दिशा फाउंडेशन, पवनाजलमैत्री अभियान व निसर्गराजा मैत्र जिवांचे आणि ग्रीनशोरा या संस्थांनी एकत्रित येऊन महिलांचा सत्कार समारंभ घेतला. ४२ नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला. या वेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अर्चना बारणे, माया बारणे आदी उपस्थित होते.तेजस लिमये, पुष्पा धर्माधिकारी, मानसी मस्के, माधुरी मापारी, जयश्री मनकर, आरती मसुडगे, मोनाली धुमाळ, वैशाली खराडे, जयश्री संदीप सकपाळ, मनीषा हिंगणे, किशोरी अग्निहोत्री, प्राजक्ता रुद्रवार, संगीता घोडके, प्रा़ भारती महाजन, सुनीता गायकवाड, बिलवा देव, विदुला पेंडसे, संगीता शालीग्राम, अनुजा गडगे, नंदिनी सूर्यवंशी, मृणाल लिमये, शैलजा देशपांडे, आभा भागवत, उष्प्रभा पागे, अपूर्वा संचेती, साधना साखरे, किशोरी हरणे, रेश्मा बोरा, सोनाली काळे कदम, वैष्णवी पाटील, पल्लवी चवरडोल, उमा क्षीरसागर, खंडागळे, गोकर्णा तोडकर, सुमित्रा वाल्हेकर, विजयालक्ष्मी भावसार, डॉ़ शैलजा भावसार, स्नेहा फुलकर यांचा सत्कार करण्यात आला. गंगा आशियाना सोसायटी, थेरगाव महिला, एम बाऊन्सर महिला, भोंडवे एम्पायर सोसायटी रावेत महिला, वूड्स विले सोसायटी मोशी महिला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला नदी घाटांवर आरती होणार आहे़ मोरया गोसावी घाटावर चतुर्थीला आरती असणार आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी दिली. प्रणाली हरपुडे यांनी सूत्रसंचालन केले. स्वाती वाल्हेकर यांनी प्रास्ताविक केले़ रेश्मा बोरा यांनी आभार मानले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड