शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडी, देहूगाव महापालिकेत, सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव, नऊ गावे होणार समाविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 05:19 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९९६ मध्ये सतरा गावे समाविष्ट झाली होती. त्यानंतर शहराच्या आजूबाजूला असणाºया गावांना महापालिकेत सामावून घेण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९९६ मध्ये सतरा गावे समाविष्ट झाली होती. त्यानंतर शहराच्या आजूबाजूला असणाºया गावांना महापालिकेत सामावून घेण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आयटी पार्क हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे आणि तीर्थक्षेत्र देहूगाव, विठ्ठलनगर ही नऊ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव २० जानेवारीला होणाºया सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे.औद्योगिकनगरीलगतची गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात हालचाली सुरूकेल्या आहेत. हिंजवडी, गहुंजे,जांबे, मारुंजी, माण, नेरे आणि सांगवडे ही सात गावे महापालिकेत समाविष्ठ करण्याबाबतचा ठराव सर्वसाधारण सभेने मंजूर केला होता. त्यानंतर ३ जून २०१५ ला या बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला. परंतु ३१ मार्च २०१५ रोजी पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापन झाल्याने हिंजवडी, गहुंजे, जांबे, मारुंजी, माण, नेरे आणि सांगवडे ही सात गावे महापालिकेत समाविष्ठ करण्याची आवश्यकता नसल्याचे राज्याच्या नगरविकास विभागाने स्पष्ट केले.दरम्यान, राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ७ मे २०१३ रोजी बैठक झाली. तेव्हा बैठकीत पिंपरी महापालिकेत चाकणसह, देहू, आळंदी, म्हाळुंगे, मोई, निघोजे, कुरुळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, कडाची वाडी, चिंबळी, केळगाव, खालुंबरे, गहुंजे या परिसराचा समावेश करणे शक्य आहे का? या बाबतचा अभ्यास करून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, पिंपरी महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी राज्य सरकारकडे सादर करण्याचा निर्णय घेतला होता. महापालिका आयुक्तांनी विभागीय आयुक्तांना ७ एप्रिल २०१७ पत्र पाठविले आहे.महापालिका हद्दीच्या पश्चिमेकडील सात गावे तसेच महापालिका हद्दीच्या उत्तरेकडील इंद्रायणी नदीचे नैसर्गिक हद्दीपर्यंतचे देहूगाव, विठ्ठलनगर, पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. महापालिका हद्दवाढीबाबतचा प्रस्ताव २० जानेवारी रोजी होणाºया सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. - श्रावण हर्डीकर, आयुक्त

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड