शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

आरोग्य यंत्रणाच आजारी

By admin | Updated: July 27, 2015 03:51 IST

तळेगावची दाभाडे येथील पुणे जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी

तळेगाव स्टेशन : तळेगावची दाभाडे येथील पुणे जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यातील समन्वय आणि नियोजनाचा अभावामुळे शहरातील कचरा नियोजन असो, की आरोग्य विभागाच्या रोगप्रतिबंधक उपाययोजना सर्वच स्तरांवर यंत्रणा कोलमडली आहे. त्यामुळे तळेगावकरांचे आरोग्य रामभरोसे आहे.जिजामाता चौकाजवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरी व ग्रामीण अशा दोन्ही यंत्रणा कार्यान्वित आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण भागातील रुग्णांसाठी पुरेसे कर्मचारी व मनुष्यबळ उपलब्ध असले, तरी नागरी रुग्णांसाठी केवळ एकच परिचारिका असल्याने त्याचा ताण इतर कर्मचाऱ्यांवर येतो आहे. शहरी विभागासाठी किमान २ पर्यवेक्षक आणि ३ ते ४ आरोग्यसेवकांची गरज असताना एकाच कर्मचाऱ्यावर भागवले जात आहे. रोगराई व साथीच्या काळात नागरी विभागात सर्वेक्षणासाठी कर्मचारीच नाहीत. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नगर परिषदेला १ आरोग्य अधिकारी, ६ परिचारिका, ६ आरोग्यसेवक, १ औषधनिर्माता, १ लिपिकासह आवश्यक पदांसाठी मंजुरी मिळाली आहे. मात्र, कित्येक वर्षांपासून ‘नोकरभरतीची प्रक्रिया सुरू आहे’ असेच ऐकायला मिळते. वैद्यकीय अधिकारी निवृत्त झाल्याने नवीन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे हे येथे रुजू झाले असले, तरी त्यांच्याकडे तळेगाव व कामशेत या दोन्ही ठिकाणची जबाबदारी असल्याने त्यांच्यावर नियोजनाचा ताण वाढला आहे. आरोग्य केंद्रात डासांचा उपद्रव व कमालीची अस्वच्छता आहे. निरोगी माणूसदेखील येथे आल्यावर आजारी पडेल अशी परिस्थिती आहे. आवारातील गवत वाढले असून, मागील बाजूस नवीन शवविच्छेदनगृहाच्या कडेला राडारोडा, मोडकी झाडे, तुटलेले सिमेंटचे खांब विखुरलेले दिसतात.रुग्णालयाच्या पर्यवेक्षकास विचारले असता, शवविच्छेदन खोलीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सांगूनही राडारोडा उचलला नसल्याचे सांगितले. विच्छेदनगृहाची जुनी खोली कधी कोसळेल सांगता येत नाही. स्वच्छतागृहात अंधार असून, पाय ठेवायलाही कोरडी व स्वच्छ जागा नाही. लसीकरण गृह आणि आॅपरेशन थिएटरसमोरील पाण्याच्या टाक्याशेजारी घाणीचे साम्राज्य असून, त्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होऊन बरे होण्याऐवजी रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नगर परिषद स्वच्छता विभागाचा कचरा व्यवस्थापन ठेकेदार व पालिकेचे सफाई कामगार यांवर कसलाही वचक राहिला नसून, तळेगावात चोहीकडे कचराकुंड्या ओसंडून वाहत असून, दुर्गंधी पसरली आहे.घंटागाडीचा कचरा गोळा करण्याचा मार्ग फक्त कागदावरच असून, जोशीवाडीसारख्या ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी जात नसल्याची तक्रार आहे.अंबिका पार्कजवळील नियोजित रेल्वे फाटकाशेजारील झुडपांत नागरी वस्तीशेजारी नगर परिषदेची ड्रेनेजची गाडी घाण ओतून देते. जनरल हॉस्पिटलच्या कंपाउंडशेजारी शर्मा बेकरीसमोर चाकण रस्त्यावर व्यावसायिक उघड्यावर कचरा फेकत आहे. गावातील मारुती मंदिरामागे तसेच स्टेशनच्या सेवाधाम हॉस्पिटल,शहा गँस पंप ते जोशीवाडी रिंगरोडवरही कचराकुंड्या तुडुंब भरल्याने मोकाट कुत्री रस्त्यावरच कचरा पांगवत आहेत. कुत्र्यांचा उच्छाद थांबविण्यासाठी आवश्यक साधनसामग्री व प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने आरोग्य विभागाला कंत्राट नूतनीकरणाची हतबलतेने वाट पाहावी लागते. (वार्ताहर)