ई-कचºयामुळे आरोग्याला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 06:36 AM2017-07-27T06:36:23+5:302017-07-27T06:36:40+5:30
ई-कचरा विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे नसल्याने शहराचे पर्यावरण धोक्यात आले आहे.
मोशी : ई-कचरा विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे नसल्याने शहराचे पर्यावरण धोक्यात आले
आहे. पर्यायाने त्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
महापालिकेने ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी उत्तम जनजागृती करून घरोघरी वेगवेगळे कचºयाचे डबे वाटण्याचा उपक्रम गेल्या वर्षभरात सुरू केला आणि त्यास नागरिकांनी उत्तम प्रतिसादही दिला. त्यामुळे आता ई- कचºयासाठीही अशाच प्रकारे जनजागृती करणे गरजेचे आहे. संगणक, त्याचे सुटे भाग, मोबाईल, केबल्स, सेल्स, किबोर्ड, माऊस, हेडफोन, पेन्सिल सेल, बॅटरी, चार्जर, प्रिंटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदींचा समावेश ई- कचºयामध्ये होतो.
जून २०१४ रोजी शहरातील ई-कचरा (ई-वेस्ट) चा भविष्यकाळातील धोका लक्षात घेऊन महापालिकेने घरोघरी जाऊन ई-कचरा गोळा करण्याची योजना जाहीर केली होती. त्यानुसार असा कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्यासाठी एक मोबाईल व्हॅन सुरू केली होती. परंतु, नागरिकांच्या प्रतिसादा अभावी हा प्रयोग महिनाभरातच अयशस्वी झाला.
योजना राहिली कागदावर
ई-कचºयाची विल्हेवाट लावण्याबाबत महापालिका पर्यावरण विभागाने गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. प्रायोगिक तत्त्वावरील हा उपक्रम यशस्वी झाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढविण्यात येणार होती. तसेच स्वत:ची ई-कचरा मोबाईल व्हॅन बनविण्याची तयारीही प्रशासनाने सुरू केली होती. आयटी पार्क व उद्योगनगरी असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये संगणक, त्याचे सुटे भाग, मोबाईल, केबल्स, सेल्स, किबोर्ड, माऊस, हेडफोन आदी ई-कचरा मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे. सध्या शहरात दररोज दहा ते पंधरा टन असा कचरा तयार होत असल्याचा पालिका प्रशासनाचा अंदाज आहे.