शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गावाकडे जाणा-यांचा हिरमोड , एसटी बंद : चालक, वाहकांच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 02:51 IST

दिवाळी सुटी सुरू झाली... अनेकांनी गावी जाण्याची तयारी केली... एसटीचे आरक्षण करून ठेवले... गावाकडे जाण्याची तयारी झाली... कुटुंबासह वल्लभनगर आगार गाठले...तेथे गेल्यानंतर वाहक आणि चालकांनी पुकारलेल्या संपामुळे एकही

- जमीर सय्यदनेहरूनगर : दिवाळी सुटी सुरू झाली... अनेकांनी गावी जाण्याची तयारी केली... एसटीचे आरक्षण करून ठेवले... गावाकडे जाण्याची तयारी झाली... कुटुंबासह वल्लभनगर आगार गाठले...तेथे गेल्यानंतर वाहक आणि चालकांनी पुकारलेल्या संपामुळे एकही एसटी आगारातून बाहेर पडणार नाही, असे सांगण्यात आले. उत्साहात गावाकडे निघालेल्यांचा हिरमोड झाला. अखेर मनस्तापासह प्रवाशांनी तिकिटाचे पैसे परत घेतले. खासगी वाहनातून दुप्पट व तिप्पट तिकीट दराने गावाकडे मार्गस्थ झाले.महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीने कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला. त्यामुळे वल्लभनगर आगारातील १३० एसटी बसगाड्या मंगळवारी मध्यरात्रीपासून बंद ठेवण्यात आल्या. नियोजनाप्रमाणे मंगळवारी सकाळी गावाकडे जाण्यासाठी आगारात आलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अचानक एसटी बसगाड्या बंद असल्याचे समजले. कुटुंबासह एसटी आगारात आलेले प्रवासी हताश, निराश झाले.आगाराचे १५ लाखांचे नुकसानदिवाळीच्या सुटीत एसटी गाड्यांना गर्दी होईल, हे लक्षात घेऊन अनेकांनी एसटी तिकिटाचे रिझर्व्हेशन केले होते.परंतु अचानक पुकारण्यात आलेल्या बंदमुळे एसटी बसगाड्या आगारात उभ्या राहिल्या. प्रवाशांनी रांग लावून तिकिटाचे पैसे परत घेतले. संपामुळे वल्लभनगर आगारातील एकूण १३० बंद ठेवण्यात आल्याने आगाराचे एका दिवसाचे १५ लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक अनिल भिसे यांनी दिली. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड