शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोडमधील अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 06:43 IST

मोकळ्या मैदानात झेंडा लावून परिसरात एक धार्मिक स्थळ बांधण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेला ओटा काढून टाकण्यात आला. अनधिकृत फलकांवरही जप्तीची कारवाई करण्यात आली.

किवळे : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या धडक कारवाईत देहूरोड बाजारपेठ व देहूरोड - मामुर्डी रस्त्यावरील शितळानगर येथील संरक्षण विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेले एक आरसीसी बांधकाम, तसेच तीन पत्राशेड, एक हॉटेल, दोन टपऱ्या, एक गॅरेज व एक वखार काढण्यात आली. तसेच मोकळ्या मैदानात झेंडा लावून परिसरात एक धार्मिक स्थळ बांधण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेला ओटा काढून टाकण्यात आला. अनधिकृत फलकांवरही जप्तीची कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू केल्यानंतर संबंधितांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेण्याची तयारी दाखविल्यानंतर काही अवधी देत पुन्हा वेगात कारवाई करण्यात आली. दुपारी तीनच्या सुमारास सुरू झालेली कारवाई सहाला थांबविण्यात आली. कारवाई दरम्यान सुमारे तीन हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कारवाई सुरू असताना मुख्य वर्दळीचा रस्ता असल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये देहूरोड बाजारपेठेत संरक्षण विभागाच्या जागेवर गुरुद्वाराजवळ एक आरसीसी बांधकाम सुरूअसलेल्या कामाचे वीट बांधकाम काढून आरसीसीचे कॉलम यंत्राच्या साह्याने काढून टाकण्यात आले. तसेच देहूरोड-मामुर्डी मुख्य रस्त्यालगत शितळानगर येथे संरक्षण खात्याच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेले तीन पत्राशेड, एक हॉटेल, दोन टपºया, एक गॅरेज, तसेच एक वखार काढून टाकण्यात आली. येथील अनधिकृत शेड काढताना काही नागरिकांनी विरोध करून संबंधित जागा ही वन विभागाची असल्याचे सांगून कारवाई थांबविण्याची मागणी केली. मात्र, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संबंधित अधिकाºयांनी दावा फेटाळत कारवाई सुरूच ठेवली. काहींनी स्वत:हून अतिक्रमण काढण्याची तयारी दर्शविल्याने त्यांना अतिक्रमण काढून घेण्यास वेळ देण्यात आली. दरम्यान, संबंधित ठिकाणी असलेल्या हॉटेलसमोर बोर्डाच्या मुख्य जलवाहिनीला जोडलेले नळजोड तुटल्याने ते अनधिकृतपणे असल्याचे उघड झाले.त्यानंतर पुन्हा कारवाई सुरूकरून सर्व शेड, टपºया, हॉटेल व वखार हटविण्यात आली. टपºया बोर्डाने ताब्यात घेणे अपेक्षित असताना काही नागरिकांनी रस्त्याने इतरत्र ओढत नेल्याने नागरिकांनी कारवाईबाबत शंका उपस्थित केल्या. नोटीस देऊन कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत काहींनी व्यक्त केले. कारवाईच्या वेळी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत यांच्यासह अतिक्रमणविरोधी पथकाचे दहा जवान, आरोग्य निरीक्षक किरण गोंटे, स्थापत्य विभागीय अभियंता प्रवीण गायकवाड, महसूल विभागासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . कारवाईसाठी एक जेसीबी यंत्र , एक डंपर , एक मालमोटार , सुरक्षारक्षक, बोर्डाच्या विविध विभागांतील तीसहून अधिक कर्मचारी उपस्थित होते .

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड