शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीत समस्यांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 05:57 IST

हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, तसेच अन्य कर्मचारी यांना मोठ्या रकमेचा पगार मिळत असल्याने त्यांचे रहाणीमानसुद्धा उंचावलेले असते.

पिंपरी : हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे अभियंते, तसेच अन्य कर्मचारी यांना मोठ्या रकमेचा पगार मिळत असल्याने त्यांचे रहाणीमानसुद्धा उंचावलेले असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अथवा खासगी बस सुविधा सक्षम नाही. त्यामुळे ते स्वत:ची चारचाकी घेऊन कंपनीत जाण्यास प्राधान्य देतात. दुचाकी घेऊन जाणाºयांना हेल्मेटशिवाय कंपनीत प्रवेश दिला जात नाही. हेल्मेटशिवाय गेल्यास कंपनीच्या प्रवेशद्वारावरच दुचाकी स्वत:च्या जोखमीवर ठेवावी लागते. त्यामुळे चारचाकी वापरणे हाच पर्याय ते निवडतात. परिणामी सकाळी कंपनीत जाण्याच्या वेळी आणि सायंकाळी कंपनी सुटतेवेळी हिंजवडी, वाकड रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होते. ही वाहतूककोंडी सद्या डोकेदुखी ठरू लागली आहे.हिंजवडी आयटीपार्कमध्ये काम करणारे अनेक जण बावधन, पाषाण, वाकड, ताथवडे, पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर आणि सांगवी परिसरातील राहणारे आहेत. त्यामुळे आयटी कंपन्या सुटण्याच्या वेळी हिंजवडी, वाकड आणि मुंबई -बंगळुरू महामार्गावर ताथवडे, वाकड परिसरात मोटारींच्या रांगा लागतात. एवढेच नव्हे तर नेरे आणि मारुंजी या आतील भागातील गावठाण रस्त्यांवरही वाहतूककोंडीचा परिणाम जाणवतो. आयटी कंपन्यांची सुद्धा अभियंत्यांसाठी वाहन सुविधा आहे. दूर अंतरावर राहणारे कंपनीच्या बससेवेचा लाभ घेतात. तसेच खासगी वाहतूक सुविधा सुरक्षित नसल्याने अभियंता तरुणी कंपनीच्या बसचा वापर करतात. जवळपास राहाणारे आयटी अभियंते स्वत:च्या मोटारी घेऊन कंपनीत जातात. स्वत:च्या मोटारी वापरण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे हिंजवडीतील वाहतूक समस्येत आणखी भर पडली आहे.हिंजवडी व वाकड येथून मुंबई -बंगळुरू महामार्ग जातो. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ आहे. वाकड पूल आणि हिंजवडी येथे सततच्या वाहतूककोंडीमुळे अपघात घडण्याचे प्रमाणही अधिक आहे. हा परिसर केवळ आयटीयन्सनाच नव्हे तर अन्य नागरिकांसाठीही असुरक्षित ठरू लागला आहे. येथील वाहतूककोंडी टाळायची असेल तर पर्यायी मार्गही नाही. हिंजवडी, वाकड, माण, मारुंजी या परिसरातून अंतर्गत रस्त्याने गेले तरी वाहनांची वर्दळ दिसून येते.वाहतूककोंडी टाळण्यासाठी सकाळी ७ ते ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ यावेळेत वाहतूक कर्मचारी तैनात असतात. याशिवाय सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत या हद्दीतील सर्वच सिग्नल बंद केले जातात. हातवारे करून वाहतुकीचे नियमन केले जाते. यावेळेत कारवाई करण्यास मुभा नाही. महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या चौकात अतिरिक्त कर्मचाºयांची नेमणूक असते. दुचाकीसाठी स्वतंत्र लेन असून बस आणि मोटारसाठीही वेगळा ट्रॅक आहे. मात्र आणखी एक स्वतंत्र लेन करण्यासाठी दीडशे कर्मचारी, ५ वॉर्डन आणि २५ जॅमरची अशी यंत्रणा गरजेची आहे. तशी मागणी वाहतूक विभागाकडे नोंदवली आहे.- दत्तात्रय पाटील, पोलीस निरीक्षक (हिंजवडी वाहतूक विभाग)