शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा, पानमसाल्याची होतेय मावळ तालुक्यात राजरोस विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 02:54 IST

किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई : ‘गुटखा किंग’ मोकाटच

पिंपरी : गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थ विक्री साठवणूक यावर राज्य सरकारने बंदी घातली असताना मावळातील सर्वच ठिकाणी हे पदार्थ खुलेआम विकले जात आहे. तालुक्याच्या मुख्य ठिकाणावरून हा माल प्रमुख व महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांना पुरवून इतर व्यापारी, किराणा दुकानदार, किरकोळ विक्रेते व पान टपरीधारकांपर्यंत पोहचत आहे. या गुटखा विक्रीच्या व्यवसायात दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, व्यापारी मोकाट आहेत.

मावळ तालुक्यात देहूरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा सह काही महत्त्वाच्या बाजारपेठ आहे. किरकोळ विक्रेते येथील व्यापाºयांकडून गुटखा, पानमसाला खरेदी करतात. येथील व्यापाºयांवर कारवाई न करता केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होत आहे. परिणामी ‘गुटखा किंग’ असलेले व्यापारी मोकाटच आहेत.अन्न व औषध प्रशासन पथकाकडून मंगळवारी (दि. ८) कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री करताना या वेळी दोन व्यापारी आढळले. त्यांच्यावर कारवाई करीत अंदाजे ८६,९१० रुपयांचा गुटखा व पानमसाला जप्त करून त्यांच्यावर कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या वेळी अन्न व औषध प्रशासन विभाग सहाय्यक आयुक्त संपत देशमुख यांच्या मार्गदर्शनाने व सहआयुक्त सुरेश देशमुख यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी आर. आर. काकडे, संतोष सावंत, अनिल गवते, स्वाती म्हस्के यांच्या पथकाने मंगळवारी सकाळपासून विविध दुकानांवर छापा टाकून ही कारवाई केली.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गदिया कॉम्प्लेक्समधील राजभवन किराणा दुकानात प्रतिबंधित अन्न पदार्थ गुटखा व पानमसाला विक्री करताना आढळून आला. या कारवाईत सुमारे ७६,२३० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. त्याच प्रमाणे शिवम ट्रेडर्स या दुकानात छापा टाकून १०,६८० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अमराराम वनाजी चौधरी व भरत चंपालाल जैन या दोन व्यापाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती काकडे यांनी दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड