शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

Gudi Padwa 2018 : गुढीपाडव्यामुळे बाजारपेठेत गर्दी, मुहूर्तावर खरेदीची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 06:20 IST

साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा म्हणजे गुढीपाडवा. या उत्सवाचा आनंद द्वीगुणित करण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी नवीन घर, सदनिका व वाहनांचे बुकिंग केले. त्यानुसार पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्यात येणार आहे.

पिंपरी : साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा म्हणजे गुढीपाडवा. या उत्सवाचा आनंद द्वीगुणित करण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी नवीन घर, सदनिका व वाहनांचे बुकिंग केले. त्यानुसार पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदी करण्यात येणार आहे.पिंपरी-बाजारपेठेत सण, उत्सावाच्या काळात मोठी उलाढाल होत असते. मराठी नववर्षारंभ असल्याने या मुहूर्तावर व्यवसाय उद्योगाची मुहूर्तमेढ रोवण्यास अनेक जण प्राधान्य देतात. यामुळे व्यवसाय व उद्योगाची भरभराट होण्याची धारणा आहे. या श्रद्धेपोटी नवीन शुभारंभ, वास्तू, वाहन, दागिने खरेदी यासाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी येथील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत.गुढीपाडवा या सणाला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सणाच्या तोंडावर अनेकांनी हक्काच्या घराचे स्वप्न साकारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शहराच्या मोशी, चिखली, जाधववाडी, चºहोली, डुडुळगाव, पुनावळे, रावेत, ताथवडे, तळवडे या भागात तसेच देहू, तळेगाव, वडगाव, कामशेत अशा मावळच्या भागातही लोक घर घेण्यास पसंदी देत आहेत. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अनेक दिवस रिअल इस्टेट मार्केट ठप्प झाले होते. मात्र, पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकांनी घरांचे बुकिंग केले आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी आकर्षक योजना दिल्या आहेत. नवनगर प्राधिकरणाकडे ही पाडव्याच्या मुहूर्तावर प्लॉट खरेदीला नागरिकांनी पसंती दिली आहे.ज्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मात्र, घरी चारचाकी नाही अशा लोकांनी पाडव्याच्या मुहूर्तावर घरी चारचाकी येईल अशी तयारी केली आहे. यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीच मोटारीची बुकिंग करून ठेवली आहे. कागदपत्रांची पूर्तता करून कर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून ठेवली आहे.सोने-चांदी बाजारात तेजीसराफ बाजारातही सोने-चांदी खरेदीसाठी लोकांची लगबग दिसत आहे. काही नागरिकांनी दागिने खरेदीला प्राधान्य दिले आहे. सुटीच्या दिवशी गुढीपाडवा आल्याने सर्वच बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत आहे. काहींनी मुहूर्तावर सोने-चांदीच्या दुकानांची सुरुवात केली आहे. तर ग्राहकांनी पाडव्यातील सराफांच्या सवलतीच्या योजनांचा लाभ घेत आर्थिक गुंतवणुकीची तयारी दाखविली आहे.

टॅग्स :Gudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८