शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडमध्ये  उड्डाणपुलावरून सत्ताधाऱ्यांत गटबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 02:57 IST

महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात निगडीपर्यंतच्या मेट्रोचा विचार केलेला नाही. तो करावा की न करावा, यावरून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत.

पिंपरी : महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात निगडीपर्यंतच्या मेट्रोचा विचार केलेला नाही. तो करावा की न करावा, यावरून भाजपाच्या पदाधिकाºयांमध्ये दोन गट पडले आहेत. प्रकल्पात कोणताही बदल केला जाणार नाही, अशी भूमिका महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेत्यांनी घेतली आहे, तर याबाबत प्रसंगी न्यायालयाचेही दरवाजे ठोठावू, असा इशारा भाजपाच्या दुसऱ्या गटाने दिला आहे.महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर निगडी भक्ती-शक्ती चौक येथे शंभर कोटींचा उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याचा विषय मंजूर करण्यात आला. दरम्यान, पिंपरी-चिंचवडपर्यंत असणारी मेट्रो निगडीपर्यंत न्यावी, अशी मागणी भाजपासह सर्व विरोधी पक्षांनी केली आहे. पहिल्या टप्प्यातच मेट्रो निगडीपर्यंत न्यावी, अशी मागणी आताही जोर धरू लागली आहे. भक्ती-शक्ती चौकातील पुलाचे नियोजन मेट्रोपूर्वी झाले. राष्टÑवादी काँग्रेसच्या कालखंडात याबाबतचा आराखडा करण्यात आला होता. मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात पोहोचला आहे. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रो न्यायची झाल्यास राष्टÑवादीच्या कालखंडातील आराखड्यात सुधारणा गरज आहे.सध्याचा प्रस्तावित पूल झाला आणि त्यानंतर मेट्रो न्यायची झाल्यास जनतेच्या पैशांचा अपव्यय होऊ शकतो. त्यामुळे आराखड्यात बदल करावा, अशी मागणी भाजपाचे सरचिचणीस अमोल थोरात यांनी केली होती. मात्र, यावरून भाजपाचे पालिकेतील पदाधिकारी, प्रशासन व भाजपाचे मूळ कार्यकर्ते यांच्यात जुंपली आहे. कोणत्याही परिस्थितीत आराखडा बदलणार नाही, अशी प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे एकाच प्रकल्पावरून भाजपात मतभेद असल्याने या प्रकल्पाला खोडा बसतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात ग्रेड सेपरेटरला खोडा हे वृत्त प्रकाशित केले होते.निगडीपर्यंत मेट्रोचे पहिल्या टप्प्यात नियोजन नाही. पहिला टप्पा पिंपरीपर्यंत आहे. ती निगडीपर्यंत न्यावी, याबाबत आम्ही आग्रही आहोत. मेट्रो जेव्हा होईल, त्या वेळी भक्ती-शक्ती चौकातून ती कशी न्यायची हा भविष्यातील नियोजनाचा भाग आहे. तूर्तास या प्रकल्पाच्या उद्घाटनास काहीही अडचण नाही. - एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेतेमहापालिकेतील भाजपाच्या पदाधिकाºयांनी निगडीतील उड्डाणपुलाचा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. प्रकल्पाला विरोध नाही. इतरांनी आजवर चुका केल्या. त्याचा शहरास फटका बसला. नियोजनात बदल करा, अशी भूमिका आहे. - अमोल थोरात, सरचिटणीस, भाजपा