शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकास रंगेहात पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मावळात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 18:56 IST

मावळ तालुक्यातील आढे गावच्या ग्रामसेवकाला दोन हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. 

ठळक मुद्देतक्रारदारास केली होती दोन हजार रूपयांची मागणीपोलीस निरीक्षक अर्चना बोदडे, पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे यांच्या पथकाने केली कारवाई 

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील आढे गावच्या ग्रामसेवकाला दोन हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. शासकीय अनुदानातून शौचालय मंजूर केल्याप्रकरणी तक्रारदारास दोन हजार रूपयांची  मागणी केली होती. परमेश्वर विनायक गोमसाळे (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, वडगाव मावळ) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका २४ वर्षीय  तक्रारदार पुरूषाने, त्यांच्या घराजवळ स्वच्छतागृह बांधले होते. त्यासाठी शासनाकडून अनुदान मिळाले होते. तक्रारदार यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यासाठी गोमसाळे याने तक्रारदाराकडे दोन हजार रूपयांची  मागणी केली. ती लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढे गावच्या चौकात गोमसाळे यास बुधवारी दुपारी अटक केली.पोलीस निरीक्षक अर्चना बोदडे, पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. शासकीय अधिकाऱ्यांनी लाच मागितल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन संबंधित अधिकाऱ्यांनी  केले आहे.

लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले दरम्यान, मावळ तालुक्यातील जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. तसेच सेंकड होमसाठी अनेकांनी तालुक्याला पसंती दिली आहे. त्यामुळे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. या व्यवहाराची नोंद करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाच दिली जात आहे. आत्तापर्यंत अनेक जण लाचलुचपत विभागाच्या कारवाईमध्ये सापडले आहेत. या कारवाईने लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड