शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक : इच्छुकांची होणार दमछाक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 02:56 IST

विविध ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित सरपंच पदासह आरक्षित जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाºया इच्छुक उमेदवाराला नामनिर्देशन अर्ज दाखल करताना अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीचा वैधतेचा दाखल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

लोणावळा : विविध ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित सरपंच पदासह आरक्षित जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाºया इच्छुक उमेदवाराला नामनिर्देशन अर्ज दाखल करताना अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जात पडताळणी समितीचा वैधतेचा दाखल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही कागदपत्रे नसलेले नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे मावळ तालुक्याचे निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार रणजित देसाई यांनी स्पष्ट केले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या आदेशाची पत्र सर्व राजकीय पक्ष व ग्रामपंचायती, तलाठी कार्यालय यांना पाठविण्यात आली आहेत. यामुळे २५ फेब्रुवारीला होणाºया निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाºया उमेदवारांची वैधता प्रमाणपत्र मिळविण्याकरिता पुरती दमछाक होणार आहे.आरक्षित जागेवर निवडणूक लढवू इच्छिणाºया उमेदवारांकडून यापूर्वी नामनिर्देशन अर्जासोबत जातीचा दाखल व पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्राकरिता प्रकरण सादर केल्याची पोच (हमीपत्र) जोडण्याची तरतूद होती. तसेच निवडणुकीनंतर सहा महिन्यांत हे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत होती. मात्र ३१ डिसेंबर २०१७ नंतर शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून जात वैधता प्रमाणपत्राऐवजी हमीपत्र घेण्याच्या सवलतीला मुदतवाढ देण्यात न आल्याने येत्या २५ फेब्रुवारी रोजी होणाºया महाराष्ट्रातील विविध ग्रामपंचायतीसह मावळातील वडगाव, भाजे, वाकसई, लोहगड, सांगिसे, मुंढावरे या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर पुसाणे, शिलाटणे, आपटी, मळवली, आंबी, येलघोल, टाकवे बु।।, खांड, साते, खडकाळा, थुगाव, आंबेगाव, माळवाडी, वराळे या ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकांमध्ये आरक्षित जागांवरून सदस्य पदाची तसेच सरपंच पदाची निवडणूक लढविणाºया इच्छुकांना महाराष्ट्र ग्रामपंचायती अधिनियम १९५८ च्या कलम १०-१ (अ) नुसार नामनिर्देशन अर्जासोबत जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे, अन्यथा हे अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे निवडणूक विभागाच्या नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांनी सांगितले.प्रमाणपत्राशिवाय अर्ज न स्वीकारण्याचे आदेश१जात दाखल्यासोबत जातीचे वैधता प्रमाणपत्र असल्याशिवाय आरक्षित जागेवरील इच्छुकांचे नामनिर्देशन अर्ज न स्वीकारण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्याने इच्छुकांची वैधता प्रमाणपत्र मिळविण्याकरिता दमछाक होणार आहे. पुणे जिल्ह्यातील मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व २७१ ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुका २५ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. त्याकरिता तहसीलदारांच्या मार्फत सादर होणारे जात वैधता प्रमाणपत्राचे अर्ज स्वीकारावेत व त्वरित त्यावर निर्णय घ्यावा, असे पत्र पुणे जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी विभागीय जात पडताळणी समिती सचिवांना दिले आहे.२पडताळणी समितीने देखील तातडीने दाखल प्रकरणांवर निकाल द्यावा अन्यथा निम्म्याहून अधिक आरक्षित जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. तसेच नव इच्छुकांना जात वैधता प्रमाणपत्रा अभावी निवडणूक प्रक्रियेपासून वंचित रहावे लागणार असल्याने पडताळणी समितीने नामनिर्देशन दाखल करण्याच्या विहित कालावधीपर्यंत दाखल प्रकरणे निकाली काढावीत, अशी मागणी तालुक्यातून जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत