शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

प्रशासनापुढे सत्ताधारी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 06:34 IST

महापालिकेत सत्तेत येऊन भाजपाला फेब्रुवारीमध्ये एक वर्ष पूर्ण होत आहे. विरोधी बाकावर बसून अनेक वर्षे ज्यांनी आक्रमकता दाखवली, ते सत्तेत आल्यावर मात्र प्रशासनापुढे हतबल झाले आहेत.

महापालिकेत सत्तेत येऊन भाजपाला फेब्रुवारीमध्ये एक वर्ष पूर्ण होत आहे. विरोधी बाकावर बसून अनेक वर्षे ज्यांनी आक्रमकता दाखवली, ते सत्तेत आल्यावर मात्र प्रशासनापुढे हतबल झाले आहेत.काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची १५ वर्षांची सत्ता उलथवून भाजपाने फेब्रुवारी २०१७च्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता काबीज केली. ‘ना भय ना भ्रष्टाचार’ असा नारा देत सत्तेवर आलेल्या भाजपाने बघता बघता एक वर्ष पूर्ण केले. महापालिकेचे अधिकारी ऐकत नाहीत, वारंवार सूचना देऊनही काम करण्याबद्दलची त्यांची उत्सुकता दिसून येत नाही. प्रशासनाकडून अधिकाºयांना पाठीशी घातले जात आहे. प्रशासनाचा अंकुश नसल्याने अधिकारी पदाधिकाºयांचे आदेश धुडकावण्याची हिंमत दाखवू लागले आहेत. प्रत्येक कामासाठी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाºयांना अधिकाºयांकडे पाठपुरावा करावा लागतो. निगरगट्ट अधिकारी करतो, पाहतो, असे म्हणत चालढकल करतात. अशा अधिकाºयांकडून कामे तरी कशी करवून घ्यायची, अशा उद्विग्न भावना, हतबलता पदाधिकाºयांकडून प्रशासनापुढे व्यक्त होऊ लागली आहे.स्थायी समितीत ठराव मंजूर होतो. कंत्राटदाराला कामाचे आदेश दिले जातात. कामाचे आदेश द्यायचे नाहीत, अशी मागणी कोणीतरी करतो. आक्षेप नोंदवला जाताच अंमलबजावणीची कार्यवाही थंडावते. शहराच्या विविध भागातील रस्ते विकासासाठी ४५० कोटींच्या खर्चास महिनाभरापूर्वी स्थायी समितीने मान्यता दिली. डांबरीकरण, मजबुतीकरण, रस्ते विकसित करणे, तसेच रस्त्याच्या कडेने विविध सेवावाहिन्या टाकणे ही कामे सुरू होणे अपेक्षित होते. मंजुरीनंतर कामे सुरुवात करण्याच्या सूचना प्रशासनाला असतानाही कामे सुरूच होऊ शकली नाहीत.स्थायी समितीची स्थापना झाल्यानंतर अगदी पहिल्या बैठकीपासून जाहिरात फलकांबाबतचे धोरण निश्चित करण्याची मागणी होत आहे. स्थायी समिती सदस्यांचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात येण्यास थोडाच अवधी शिल्लक राहिला आहे. जाहिरात फलकाचे धोरण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. एखाद्या अधिकाºयास काम का होत नाही, असा जाब विचारावा, तर अधिकारी जाणीवपूर्वक बैठकांना अनुपस्थित राहतात. कंत्राटदार सूचनांचे पालन करीत नाहीत. अधिकारी ऐकत नाहीत, काम कसे करायचे, अडथळ्यांच्या शर्यतीत काम करणे कठीण आहे, अशा शब्दांत व्यक्त होणारी पदाधिकाºयांची हतबलता बरेच काही सांगून जाते.सक्षम समितीने मंजुरी दिली असताना कामे सुरू का होत नाहीत? अधिकाºयांच्या बेपर्वाईच्या कार्यपद्धतीमुळे ४५० कोटींची कामे रखडली आहेत. असे कामे न होण्याचे खापर अधिकाºयांवर फोडले जात आहे. निविदा कमी दराची भरायची, मुदतवाढ मागायची, नंतर वाढीव खर्चाचा प्रस्ताव देऊन अधिकचे बिल वसूल करायचे अशी करदात्यांचे नुकसान करणारी पद्धती महापालिकेत रुजली आहे. वाढीव खर्चाच्या प्रायोजनात कोणाचे तरी हितसंबंध जोपासले जात असावेत, असा आरोपही सत्ताधाºयांकडून झाला.सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाºयांची ही एक बाजू त्यांच्याकडून मांडली गेली, तर सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी, काही नगरसेवक आणि प्रशासन संगनमताने महापालिकेची लूट करीत आहेत, असा सनसनाटी आरोपशिवसेनेच्या खासदारांनी केला आहे. ‘ना भय ना भ्रष्टाचार’ असे आश्वासन देऊन महापालिकेत ज्यांनी सत्ता मिळविली, तेच भाजपा नेते भ्रष्टाचार करून महापालिकेची लूट करू लागले आहेत, असा थेट आरोप शिवसेनेचे खासदारद्वयी शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंग बारणे यांनी केला आहे. ४२५ कोटींच्या कामात ठेकेदारांची रिंग करून ९० कोटींचा भ्रष्टाचार केला असून, याप्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.१३ डिसेंबरला १२ ठरावीक ठेकेदारांची रिंग करून ४२५ कोटींचे काम दिले आहे. महापालिकेत यापूर्वीही हेच ठेकेदार १५ ते २५ टक्के कमी दराने काम करत होते. तेच ठेकेदार या वेळी ८ ते ९ टक्के जादा दराने निविदा भरून काम करायला पुढे आले आहेत. २५ टक्क्यांचा सरळ फरक दिसून येतो. मोठा गफला आहे. देशातील भ्रष्टाचाराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाºयांच्या भ्रष्टाचाराचा वेग अधिक आहे.ठेकेदारांची रिंग करून महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान केले आहे. त्यातून भाजपाचे पदाधिकारी, महापालिका आयुक्त आणि काही लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने महापालिकेला लुटण्याचे काम सुरू आहे. एका वर्षात २५० कोटींना चुना लावला, आणखी चार वर्षांत किती भ्रष्टाचार होणार आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून, विरोधी बाकावर बसून आक्रमकता दाखविणारे सत्तेत आल्यानंतर प्रशासनापुढे हतबल का झाले, याचे उत्तर कशात दडले आहे, हे सहज उमगते.- संजय माने

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड