पिंपरी : सांगवी प्रभाग क्रमांक ३२ मधील सर्वसाधारण गटातील अपक्ष उमेदवार प्रशांत शितोळे व त्यांच्या समर्थकांनी ‘व्हलेंटाइन डे’चे औचित्य साधून सांगवी व नवी सांगवी परिसरातील नागरिकांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी ते म्हणाले, ‘‘नागरिकांनी कोणत्याही दहशत, दबावाखाली मतदान न करता आनंदाने, प्रेमाने, उत्साहाने शांततेत मतदानास बाहेर पडावे. याकरिताच हे आपुलकीचे प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाबपुष्प वाटत आहे.’’प्रशांत शितोळे यांचा प्रभागात जोरदार प्रचार सुरू असून, त्यांनी प्रचारासाठी पदयात्रेतून मतदारांच्या गाठी-भेठी घेऊन संवाद साधला.अपक्ष उमेदवार प्रशांत शितोळे यांनी पदयात्रेवर भर देत सांगवी गावठाण, गंगानगर, आनंदनगर, शितोळेनगर, पीडब्ल्यूडी कॉलनी आदी भागात पदयात्रेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन गाठीभेठी घेत सांगवीच्या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन केले. या वेळी पदयात्रेत नगरसेविका सोनालीताई जम, नगरसेवक पोपट जम, सामाजिक कार्यकर्ते प्रकाशभाऊ ढोरे, दिलीप तनपुरे, बाबासाहेब ढमाले, कुमार ढोरे यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी होते. प्रभागातील नागरिक, तसेच तरुण मतदारांकडून अपक्ष उमेदवार प्रशांत शितोळे यांचे स्वागत झाले.(वार्ताहर)
गुलाब देऊन मतदारांना शुभेच्छा
By admin | Updated: February 15, 2017 02:11 IST