शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न सोडविल्याची चमकोगिरी :श्रेयासाठी कार्यकर्त्यांमध्ये धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:05 IST

विकासकामांबद्दल विविध राजकीय पक्ष आग्रही असतात. आपल्याच काळात प्रकल्पाचे भूमिपूजन, उद्घाटन व्हावे असा त्यांचा आग्रह असतो.

पिंपरी : विकासकामांबद्दल विविध राजकीय पक्ष आग्रही असतात. आपल्याच काळात प्रकल्पाचे भूमिपूजन, उद्घाटन व्हावे असा त्यांचा आग्रह असतो. विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी अक्षरश: त्यांच्यात चढाओढ दिसून येते. त्यामुळे एकाच प्रकल्पाचे दोनदा भूमिपूजन, उद्घाटन झाल्याचे नागरिकांनी अनुभवले आहे. श्रेयासाठी केवळ नेतेच नाही, तर कार्यकर्त्यांचीही स्पर्धा असल्याचे दिसून येऊ लागले आहे. आपणच एखाद्या प्रश्नावर सर्वप्रथम आवाज उठविला, हे दाखवून देण्यासाठी त्यांच्यात चढाओढ दिसून येत आहे.शहरात एखादा प्रकल्प राबवावा, उड्डाणपूल अथवा अन्य विकास प्रकल्प साकारला असल्यास त्यास कोणाचे नाव द्यावे, याचा पत्रव्यवहार महापालिकेच्या प्रशासन विभागाशी सुरू होतो. एखादा कार्यकर्ता महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन ही बाब निदर्शनास आणून देतो. एकाने दिले म्हणून अन्य कार्यकर्तेही पाठोपाठ प्रशासनाला पत्र, निवेदन देतात. एकाने पत्र दिले, तर दुसरा पहिल्याला श्रेय मिळायला नको, या उद्देशाने आंदोलन करून जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो.चिंचवड येथील एका उड्डाणपुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. पुलाचे काम पूर्ण होण्याआगोदरच श्रेय लाटण्याकरिता पुलाला काय नाव द्यावे, हे सुचविण्याची घाई काही कार्यकर्त्यांनी केली. एकाने मागणी करताच अन्य संघटनेच्या एका कार्यकर्त्याने दुसरेच नाव सुचविले. खरे तर नाव कोणीही सुचविले,तरी ज्या प्रभागाच्या कार्यक्षेत्रात प्रकल्प आहे. त्या प्रभागाच्याबैठकीत नाव देण्यासंबंधीचा ठराव संमत होत असतो. हे माहितीअसूनही निवेदन देण्याची घाई कार्यकर्ते करतात, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष-महापालिकेकडे एखाद्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची एक पद्धत आहे. सुरुवातीला निवेदन दिल्यानंतर महापालिकेच्या संबंधित विभागाला स्मरण पत्र देता येते. संबंधित विभागाच्या अधिकाºयाकडून दखल घेतली जात नसेल, तर वरिष्ठ अधिकाºयाकडे अर्थात आयुक्तांकडे दाद मागता येते. त्यांच्याकडूनही दखल घेतली जात नसेल, तर आंदोलनाचा मार्ग पत्करला जातो. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये एक निवेदन दिले की, थेट उपोषणाचे हत्यार उपसले जाण्याचे प्रकार घडू लागले आहेत. संबंधित अधिकाºयांना त्या प्रश्नाची दखल घेण्यास पुरेसा अवधी न देता आंदोलनाची घाई करणाºया कार्यकर्त्यांना त्या प्रश्नाचे श्रेय अन्य कोणाला जाऊ द्यायचे नसते. त्यामुळे किरकोळ प्रश्नांवरही तीन ते चार दिवसांची आंदोलने होतात. शहरातील गंभीर प्रश्नांबाबत मात्र कोणीही पुढे येताना दिसत नाही.