तळेगाव दाभाडे : इंदोरी (ता. मावळ) येथील जुन्या पुलावरून इंद्रायणी नदीपात्रात उडी घेऊन एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत इंदोरी गावचे पोलीस पाटील जयदत्त शिंदे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. अंकिता सुरेश शेवकर (वय १९, रा. इंदोरी, ता. मावळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. अंकिता ही तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र विद्या पॉलिटेक्निकमध्ये संगणक शाखेत शेवटच्या वर्षात शिकत होती. कॉलेजला जाते असे आईला सांगून अंकिता शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती कॉलेजला गेलीच नाही. (वार्ताहर)
नदीपात्रात उडी घेऊन तरुणीची आत्महत्या
By admin | Updated: March 12, 2017 03:21 IST