शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

पिंपरी चिंचवडमध्ये बारावीच्या निकालात मुलीचं हुशार, गतवर्षीच्या तुलनेत शहराचा निकाल ०.८४ टक्क्यांनी घटला   

By विश्वास मोरे | Updated: May 5, 2025 20:45 IST

HSC Exam Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल आज सोमवारी दुपारी ऑनलाईन जाहीर केला. पिंपरी- चिंचवड शहराचा निकाल ९५. ८० टक्के लागला असून निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे.

पिंपरी  - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल आज सोमवारी दुपारी ऑनलाईन जाहीर केला. पिंपरी- चिंचवड शहराचा निकाल ९५. ८० टक्के लागला असून निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. पुन्हा एकदा मुलीचं हुशार असल्याचे सिद्ध केले आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत शहराचा निकाल ०. ८४ टक्क्यांनी घसरला आहे.

बारावीचा निकाल सोमवारी होणार असल्याचे सोशल मीडियावरून विद्यार्थी आणि पालकांना एक दिवस अगोदर रविवारी समजले. त्यामुळे निकालाची उत्सुकता आणि धडधड कायम होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून आज दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला. तर विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि संकेतस्थळावरून निकाल पाहिला.

पिंपरी चिंचवड शहरातून ९९७९ मुलांनी तर ८८२४ मुली अशा एकूण १८८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  त्यापैकी ९९३३ मुले आणि ८७९२ मुली अशा एकूण १८ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.  त्यापैकी ९४८४ मुले आणि ८५९६ मुली असे एकूण १८ हजार ०८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहराचा निकाल ९५. ८० टक्के लागला आहे. त्यात मुलांचे प्रमाण ९५. ६४ टक्के, तर मुलींचे प्रमाण ९७. ७४ टक्के आहे. पिंपरी- चिंचवड शहरात मुलींनी बाजी मारली आहे.

निकाल घटला ! पिंपरी चिंचवड शहराचा निकाल गेल्या वर्षी ९६.६४ टक्के  लागला होता. तर यंदा निकाल ९५. ८० टक्के लागला आहे.  गतवर्षीच्या तुलनेत ०.८४ टक्क्यांनी शहराचा निकाल घसरला आहे.

मावळ तालुक्याचा निकाल ९२. ९७, मुळशीचा निकाल ९६.८३ टक्केमुळशी तालुक्यातून १४५३ मुले,  १३९४ मुली असे २८४७ विद्यार्थी परीक्षेला बसली होती.  त्यापैकी १४०६ मुले, १३७०  मुली असे एकूण २७७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुळशी तालुक्याचा निकाल ९६.८३ टक्के लागला आहे.  मावळ तालुक्यातून १९१४ मुले,  १९९६ मुली असे एकूण ३९१०  विद्यार्थी परीक्षेला बसले होते.  त्यापैकी १७७८ मुले, १३३४ मुली असे एकूण ३७१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  मावळ तालुक्याचा निकाल ९२. ९७ टक्के लागला आहे.  खेड तालुक्यातून २४९२ मुले,  २३५७मुली, असे ४८४९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २२५५मुले आणि २२८५ मुली असे एकूण ४५१०  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.  खेड तालुक्याचा निकाल ९०.८५ टक्के लागला आहे.  त्याचबरोबर हवेली तालुक्यातून ६६९८ मुले, ५३७४ मुली, असे एकूण १२ हजार ०७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.  त्यापैकी ६३९८ मुले आणि ५२५३ मुली असे एकूण ११६५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हवेली तालुक्याचा निकाल ९५. ९३ टक्के लागला आहे.

सायबर कॅफे आणि मोबाईलवर निकाल पाहण्यासाठी उत्सुकता बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्याच आठवड्यामध्ये निकाल लागला. एक दिवस अगोदर निकाल लागणार असल्याचे कळल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आणि किती गुण मिळतील असा मानसिक तणाव कायम होता. आज निकाल जाहीर होणार असल्याने आज दुपारी एक वाजेपर्यंत घरोघरी निकालाची चर्चा उत्सुकता शिगेला पोहोचली होती. एकच्या ठोक्याला निकाल हाती आल्यानंतर मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा दिल्या. मुलांनी यशाचा आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव सुरु होता. तर सायबर कॅफेमधून निकालाची प्रिंट काढताना मुले दिसून आले.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड