शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

चिठ्ठी लिहून तरुणीची आत्महत्या, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:33 AM

खराळवाडीतील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती आली आहे

पिंपरी : खराळवाडीतील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती आली आहे. ‘मी आत्महत्या करीत आहे, मला शोधू नका’ असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी खराळवाडी येथे घडली. वर्षा शंकर जगताप (वय १९, रा. एचए कॉलनी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.खराळवाडीतील खराळआई उद्यानाजवळ वैष्णवी पार्क ए जे चेंबर्स ही इमारत आहे. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास इमारतीच्या डक्टमध्ये काही तरी पडल्याचा मोठा आवाज आला. आजूबाजूचे लोक त्या दिशेने धावले. तिसºया मजल्यावरून उडी मारल्याने खाली पडून मृत्यू झालेली तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीला तत्काळ वायसीएम रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सुरुवातीला तिची ओळख पटली नसल्याने तिचे छायाचित्र खराळवाडी परिसरात पोलिसांनी नागरिकांना दाखवले. ती एचए कॉलनीतील रहिवासी असल्याचे नागरिकांनी सांगितले. पोलिसांनी एचए कॉलनीत चौकशी केली असता, ती राहत असलेल्या ठिकाणाची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. तिच्या घरात चौकशी केली असता, एका खोलीत तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSuicideआत्महत्या