शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

पुरेसे पाणी मिळावे, वाहतूक व्हावी सुरळीत

By admin | Updated: January 12, 2017 02:50 IST

महेशनगर, वायसीएम हॉस्पीटल, संत तुकारामनगर, वल्लभनगर मिळून पिंपरीमधील मध्यवर्ती ठिकाण असणारा

पिंपरी : महेशनगर, वायसीएम हॉस्पीटल, संत तुकारामनगर, वल्लभनगर मिळून पिंपरीमधील मध्यवर्ती ठिकाण असणारा प्रभाग २० बनला आहे. महाविद्यालये, हॉस्पिटल, उद्यान, शौचालये, अग्निशामक केंद्र अशा अनेक सुविधांनी पुरक असा हा प्रभाग आहे. प्रभागाला भेडसावणारी मोठी समस्या म्हणज पाणीटंचाई आाहे. प्रभागात व्यावयायिकांचे प्रमाण जास्त आहे. जागोजागी खाद्यपदार्थांच्या टपऱ्या, स्टॉल लागलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा वापर जास्त प्रमाणात होतो. या सर्व कारणांमुळे त्या ठिकाणील निवासी क्षेत्रास पाणी कमी प्रमाणात मिळते. शाळा, कॉलेज आणि हॉस्पिटलमुळे प्रभागात व्यावसायिकांची चलती आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने टपऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, तेथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा दुप्षरिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. वायसीएम ते डी. वाय. पाटील या रस्त्यावर सतत वाहतूककोंडी होत असते. विशेषत: सकाळी आणि संध्याकाळी कोंडी जास्त पहायला मिळते. महेशनगर येथील चौकात नियमबाह्य पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने वाहतूककोंडी होते. रिक्षाचालक बेकायदेशीर रीत्या बस स्थानकाजवळ रिक्षा उभे करताना  सर्रास आढळतात. या प्रभागातील कारंज्याजवळ सतत अनाधिकृत फ्लेक्स लावलेले असतात, त्यामुळेत्या कारंज्याची ओळख संपुष्टात येऊ लागली आहे, असे येथील नागरिकांचे मत आहे. पिंपरी ते काळेवाडी रस्ता हा गर्दीचा रस्ता आहे. या ठिकाणी कित्येकदा वाहकुकींच्या नियमाचे उल्लंघन होताना दिसून येते. उपाययोजना करुन प्रभागातील समस्या सोडविण्याची नागरिकांची मागणी आहे. (प्रतिनिधी)महेशनगर येथे सार्वजनिक शौचालयाची संख्या कमी आहे. पाणी पुराशा प्रमाणात येत नाही . गेल्या २ महीन्यापासून पाण्याचे मीटर बसवले आहे, परंतू त्याना प्रत्येक महीन्याचे बील आले नाही यामुळे त्यांना एकत्र बील भरणे गैरसोयीचे होईल. त्यामुळे पाण्यासाठी घराबाहेर वारंवार पडावे लागत आहे.- भगवान माने, महेशनगर

पिंपरी-काळेवाडी रस्त्यावर नेहमी गर्दी दिसून येत असते. या ठिकाणी रस्ता हा छोटा असल्यानेही गर्दी होत असते. तसेच अनेक चालक मनमानी करतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिसाची नेमणूक करणे गरजेचे आहे. शाळेजवळील रस्त्यांवर वेग मर्यादेचे चिन्हे लावल्यास अपघाताची शक्यता कमी होईल. - शालिनी तिवारी, पिंपरी या परीसरात गेल्या काही काळात उद्यान, शौचालय योग्य ती सोय झाली आहे. रस्त्यांची सुव्यवस्था असल्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रश्न निर्माण होत नाही. रस्त्याचे सुशोभिकरणही झाले आहे. परिसरात दोन मोठे हॉस्पीटल तसेच उद्याने, महाविद्यालये यामुळे परिसरास महत्त्व मिळाले आहे. - संतोष अभंग, संत तुकाराम नगर