शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोचे काम सुरू असताना गॅसगळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:37 IST

पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी सीएमई हॅरिस पुलाजवळ मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास एमएनजीएल वायुवाहिनीतून गळती झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी सीएमई हॅरिस पुलाजवळ मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास एमएनजीएल वायुवाहिनीतून गळती झाली. वायुगळती नियंत्रणात आणल्याने या घटनेत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही.पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरासाठी महामेट्रोचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात पिंपरी महापालिका परिसरात काम सुरू आहे. सीएमई हॅरिस पुलाजवळ मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. पाया किती दणकट आहे हे जाणून घेण्यासाठी १०० मीटर अंतरावर खड्डे खणले जात आहेत. तसेच तांत्रिक सर्वेक्षण सुरू आहे. त्याचबरोबरच ड्रिलिंग मशिन आणि कामगारांच्या मदतीने दीड मीटर खोल खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. त्याच ठिकाणी मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास ठेकेदार ड्रिलिंग करीत असताना एमएनजीएलच्या वाहिनीस धक्का लागला. त्यातून वायुगळती होत असल्याचे कर्मचाºयांच्या निदर्शनास आले. माहिती मिळताच मेट्रो प्रकल्प अधिकारी, वाहतूक पोलीस, अग्निशामक दलाचे जवान आणि गॅसवाहिनीचे कर्मचारी दाखल झाले.वाहिनीबाबत माहिती नसल्याने गळतीमेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होण्याअगोदर ज्या मार्गावरून मेट्रो धावणार आहे, त्या मार्गावर जिओटेक्निकल सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्या वेळी या भागात कोणत्याही प्रकराची वायुवाहिनी असल्याचे पुरावे अथवा नकाशे, फलक आढळले नाहीत. शिवाय संबंधित विभागाकडूनही या वायुवाहिनीबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती मेट्रोला दिली नव्हती. वायुवाहिनीबद्दलचा कोणताच माहितीफलक अथवा नकाशा या ठिकाणी नसल्याने खोदकाम करताना वायुगळती झाल्याचे मेट्रोचे म्हणणे आहे.