शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

कचरा डेपोचा त्रास, विविध प्रकल्प फक्त नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 03:40 IST

मोशी परिसरात कचरा डेपोला लागलेल्या भयानक आगीने सर्वांचे लक्ष वेधले असून, आग लागल्यानंतर त्याचे लोळ भर रस्त्यावरून दिसत होते. अद्यापही परिसरात धुराचे लोळ पसरले असून आगीमुळे मोशीच्या कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मोशी - मोशी परिसरात कचरा डेपोला लागलेल्या भयानक आगीने सर्वांचे लक्ष वेधले असून, आग लागल्यानंतर त्याचे लोळ भर रस्त्यावरून दिसत होते. अद्यापही परिसरात धुराचे लोळ पसरले असून आगीमुळे मोशीच्या कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.सुफलाम व आरोग्यदायी असलेले शेतकरी वर्गाची लक्षणीय संख्या असलेले एक गाव. गावात ग्रामस्थांकडून गावगाडा सुरळीत सुरु असताना गावाचा महापालिकेत समावेश करण्याचा निर्धार १९९७ ला कारण्यात आला. गाव महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत गावात विविध मते होती अखेरीस गावाचा पालिकेत समावेश झाला़ मात्र या गावाच्या लोकांना आजतागायत भेडसावत असलेला मुख्य प्रश्न म्हणजे आ वासून असलेला कचरा डेपो.मोशी बोºहाडेवाडीकडून येताना समोर नजरेस दिसतो, तो मोशी कचरा डेपोचा भव्य डोंगर. हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे़ कारण सध्या औरंगाबाद येथे कचरा डेपोवरून सुरू असलेले आंदोलन बोलके आहे. कचरा डेपोवरून अनेक राजकीय पक्षांनी आपली पोळी भाजून घेतली खरी मात्र यामध्ये हाल झाले ते मोशीकरांचे हे वास्तव आहे. केवळ राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोशीकरांना कचरा डेपो हलवण्याचे सांगितले जाते. नंतर त्या कचरा डेपोबाबत केवळ चर्चाच होत असते प्रत्यक्ष सामना तर मोशीच्या सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.अद्यापही डेपोत लागलेल्या आगीमुळे धूर धुपसत असून त्याचा त्रास आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी सहन करत आहे़ प्रशासन केवळ तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना म्हणून लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. आत्तापर्यंत आग विझवण्यासाठी ५० ते ६० टँकर पाणी मारण्यात आले आहे. कायमस्वरूपी आग विझावी म्हणून आगीवर मातीही टाकण्यात येत आहे.शहरातील दैनंदिन कचरा या डेपोमध्ये आणून त्यावर प्रक्रिया करून विविध प्रकल्प उभारले जातील. अशा प्रकारे या डेपोची सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळामध्ये कचरा डेपोला स्थानिक रहिवाशांनी विरोधदेखील केला. त्यानंतरही हा प्रकल्प सुरू झाला. आता तर त्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे, या डेपोत असलेले प्रकल्प फक्त नावालाच असून अनेक प्रकल्प आद्यपही सुरू करण्यात आले नाही. केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी विविध प्रकल्प सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र परिस्थिती वेगळी असून नावालाच प्रकल्प असल्याचे दिसून येते.नवीन कचरा डेपोला परवानगी नाही़ मुख्यमंत्र्यांनी नवीन कचरा डेपोला यापुढे परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे़ त्यामुळे शहरात अन्य ठिकाणी कचरा डेपो होणार नाही हे वास्तव आहे़ परिणामी सध्या मोशी कचरा डेपो हा सर्व शहराच्या दृष्टीने उत्तम पर्याय झाला आहे. पिंपरी चिंचवड शहराचा कचरा याठिकाणी आणून टाकतात.स्थानिक गावकरी कचरा डेपोसाठी एकत्र येणार?सध्या मोशी गावाचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय पक्षाबरोबर या भागातील स्थानिक व गावकरी, सर्वसामान्य नागरिकांचे योगदान मोलाचे ठरणार आहे. गावात मतभेद असल्यामुळे कचरा डेपोसारखा आरोग्यास हानीकारक प्रकल्प मोशीत यापूर्वी आला. मात्र भविष्यात त्याचे गावावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेऊन या कचरा डेपो प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा उभा करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्थानिक गावकी भावकी एकवटणार का हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणे