शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

गणेशभक्तांचे मशिदीसमोर होणार स्वागत; मुस्लिम बांधव देणार गुलाबपुष्प

By नारायण बडगुजर | Updated: September 9, 2022 11:06 IST

गणेशोत्सव जल्लोषाचा तसाच जातीय सलोख्याचे दर्शन घडविणाराही उत्सव आहे.

पिंपरी :

गणेशोत्सव जल्लोषाचा तसाच जातीय सलोख्याचे दर्शन घडविणाराही उत्सव आहे. काेरोनाच्या काळात जात-धर्म आदीचा विचार न करता गरजूंना मदतीचा हात देण्यात आला. यातून महामारीत माणुसकीचे दर्शन घडले. त्याचीच प्रचिती गणेशोत्सवात येत आहे. दहा दिवसांत लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी निघालेल्या मिरवणुकीतील गणेशभक्तांचे मुस्लिम बांधवांकडून स्वागत करण्यात येणार आहे. यातून जातीय सलोख्याने दर्शन होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात काही भागातील मंडळांकडून पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी विसर्जन करण्यात आले. चिंचवड आणि पिंपरी येथे दहाव्या दिवशी विसर्जन केले जाते. चिंचवड आणि पिंपरी येथे विसर्जनाची मुख्य मिरवणूक असते. या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांचे स्वागत आणि गणेशभक्तांना पाणी, अन्नदान केले जाते. यंदा असे स्वागत मुस्लिम बांधवांकडून होणार आहे.

...येथे होणार स्वागतचिंचवड येथील मोहननगर, दत्तनगर, विद्यानगर, मोहननगर, चिंचवड गावातील गांधी पेठ येथील मशिद तसेच पिंपरी येथील नेहरुनगर, मिलिंदनगर, मोरवाडी, खराळवाडी व काळेवाडी फाटा येथील मशिदींतर्फे गणेशभक्तांच्या स्वागताचे नियाेजन केले आहे. शहरात शुक्रवारी दुपारनंतर मिरवणूक मार्गावर स्वागत होणार आहे.

सरबतासह श्रीफळगणेशमंडळांचे स्वागत करताना गुलाबपुष्प, पाण्याच्या बाटल्या, सरबत देण्यात येणार आहे. मंडळाच्या अध्यक्षांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानिक केले जाणार आहे. पिंपरी कॅम्प येथे रिव्हर रोड येथे काही संस्था, संघटनांकडून तसेच मंडळांकडून अन्नदान करण्यात येणार आहे.  

भाईचारा म्हणून पाणी वाटप आणि गुलाबपुष्प देण्यात येणार आहे. दोन धर्मांमध्ये एकता असल्याचे यातून दिसून येईल. जातीय सलोखा राखण्याची आपली परंपरा आहे. तीच आपण याहीपुढे राखणार आहोत. त्याचाच हा एक प्रयत्न आहे.  - मुनाफ तराजगार, तवकल्ला जामा मशिद, नेहरुनगरआजच्या घडीला एकतेचे दर्शन घडणे महत्त्वपूर्ण आहे. यात पोलिसांचाही सकारात्मक प्रतसाद मिळाला. त्यामुळे मंडळ आणि गणेशभक्तांचे स्वागत करण्याच्या उपक्रमाला चालना मिळत आहे.  - गुलजार शेख, मक्का मशीद काळेवाडी फाटा, थेरगाव 

उत्सव साजरा करताना जल्लोष केला जातो. शांततेत निर्विघ्नपणे उत्सव झाला पाहिजे. त्यासाठी जातीय सलोखा आवश्यक आहे. शांतता समितीच्या बैठकांमधून त्यासाठी आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी गणेश मंडळ आणि गणेशभक्तांचे स्वागत करण्यात येणार आहे. नागरिकांनी शांतता राखत सहकार्य करावे.- मंचक इप्पर, पोलीस उपायुक्त  

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGanesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जन