शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भडकाऊ भाषणाचा परिणाम नाही - गफ्फार मलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:39 IST

गफ्फार मलिक : भारिप बहुजन महासंघ व एमआयएमवर टीका

तळेगाव दाभाडे : भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएमच्या नेत्यांचे मुस्लिम आणि दलितांसाठी कोणतेही योगदान नाही. समाजाच्या विकासाचा आराखडाही नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांशी जोडलेल्या या दोन्ही समाजातील लोकांवर या नेत्यांच्या केवळ भडकाऊ भाषणाने कोणताही परिणाम होणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अ. गफ्फार मलिक यांनी व्यक्त केले.

मावळ तालुका विधानसभा मतदार संघातील अल्पसंख्याक सेलच्या मेळाव्यासाठी ते प्रमुख अतिथी म्हणून तळेगाव दाभाडे येथे आले होते. मेळाव्यानंतर पत्रकारांशी झालेल्या वार्तालापात त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा जातीय तेढ निर्माण करण्याची शक्यता वर्तवली. गफ्फार मलिक म्हणाले ‘‘देशातील आणि राज्यातील सेक्युलर विचारसरणीचे लोकांनी भाजपा आणि शिवसेनेच्या उपद्रवी मूल्यांना ओळखले असून, पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातून या वेळी शरद पवार यांच्या पाठीशी तमाम मतदार भक्कमपणे साथ देतील.’’ अल्पसंख्याक समाजातील प्रज्ञावंतांना व्यासपीठ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्र्फे लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई किंवा पुण्यात त्यांचा पहिला मेळावा होईल. जातीय सलोखा राखण्यासाठी विशेषत: निवडणुकीच्या काळातील अल्पसंख्याकांची सुरक्षितता यावर चर्चा होईल.गफ्फार म्हणाले, ‘‘अल्पसंख्याकावर देशभरात होणारे अत्याचार खेदजनक आहेत. समाजात फूट पाडणे आणि पैसा वाटणे यांच्या जोरावर ही निवडणूक जिंकण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप मलिक यांनी या वेळी केला. राष्ट्रवादी पक्षाने त्याची दखल घेत अल्पसंख्याकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. समाजात फूट पाडणाऱ्या घटनांपासून सावध राहण्याचा आणि शक्यतो कटू प्रसंग टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला. समाजविघातकांना संधी देऊ नका आणि वेळ पडलीच तर पोलीस व जिल्हाधिकारी प्रशासनास तत्परतेने कळवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNCPराष्ट्रवादी काँग्रेस