शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील एका मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेशाच्या बहाण्याने डाॅक्टर तरुणीला २० लाखांना गंडा

By नारायण बडगुजर | Updated: April 4, 2024 17:46 IST

तळवडे आणि पिंपरी येथे जानेवारी २०२३ ते ३ एप्रिल २०२४ या कालावधीत ही घटना घडली....

पिंपरी : एमडी या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पिंपरी एका मोठ्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून तरुणीची १९ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तळवडे आणि पिंपरी येथे जानेवारी २०२३ ते ३ एप्रिल २०२४ या कालावधीत ही घटना घडली. विशाल पवार, भास्कर राव, कुलभूषण कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फसवणूक झालेल्या २६ वर्षीय तरुणीने याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे वैद्यकीय अभ्यासक्रमातील ‘बीएएमएस’पर्यंत शिक्षण झाले आहे. डाॅक्टर असलेल्या या तरुणीला उच्चशिक्षणासाठी ‘एमडी’ या वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता. संशयितानी भास्कर राव हे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनात काम करत असल्याचे फिर्यादी तरुणीस खोटे सांगितले. फिर्यादी तरुणीस एमडी या वैद्यकीय अभ्यासक्रमाला व्यवस्थापन कोट्यातून पिंपरीतील महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले. त्यासाठी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. 

फिर्यादी डाॅक्टर तरुणीचे वडील शिक्षक असून त्यांनी कर्ज काढून संशयितांना १९ लाख ७५ हजार रुपये दिले. त्यानंतर फिर्यादी तरुणीने प्रवेशासाठी तगादा लावला. मात्र, संशयितांनी टाळाटाळ केली. त्यावरून फिर्यादी तरुणीने याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. त्यानंतर संशयितांनी पैसे देण्याचे लेखी स्वरुपात मान्य केले. त्यासाठी फिर्यादी तरुणीला धनादेश दिले. मात्र, धनादेश वटले नाहीत. त्यामुळे फिर्यादी तरुणीने पुन्हा पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक अजित काकडे तपास करीत आहेत.    

शैक्षणिक वर्ष गेले वाया

फिर्यादी तरुणीने गेल्या वर्षी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान, संशयितांनी तरुणीचा विश्वास संपादन त्यांच्याकडून पैसे घेतले. मात्र, प्रवेश न मिळवून देता फसवणूक केली. यात तरुणीचे शैक्षणिक वर्ष वाया गेले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी