शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून चौघांवर टोळक्याचा हल्ला, चार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 03:06 IST

पूर्ववैमनस्यातून चार जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करीत लाकडी दांडक्याने चार जणांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास कासारवाडीतील हिराबाई झोपडपट्टी येथे घडली. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी : पूर्ववैमनस्यातून चार जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करीत लाकडी दांडक्याने चार जणांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास कासारवाडीतील हिराबाई झोपडपट्टी येथे घडली. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर रमेश बोथ, उमेश सोमनाथ मिजार (वय १८), आमजद इस्माईल शेख (तिघे रा. कासारवाडी), मोसीन मेहबूब शेख (वय १९, रा. महादेवनगर, भोसरी) या चौघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत कृष्णा गंगाराम जमादार (वय १७, रा. विकासनगर, कासारवाडी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादी कृष्णा जामदार याची चार दिवसांपूर्वी कासारवाडी येथे क्रिकेट स्पर्धेवेळी दुचाकी मागे घेण्यावरून आरोपींशी वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी शुक्रवारी कृष्णा आणि त्याच्या तीन मित्रांवर कोयत्याने वार केले. तसेच लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. भोसरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.मोहननगर येथील कंपनीत आग कार्यालयीन साहित्याचे नुकसानपिंपरी : चिंचवड मोहननगर येथील ओंकार इंजिनिअरिंग कंपनीला शनिवारी सायंकाळी आग लागली. संत तुकारामनगर अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलाच्या ३ बंबांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविले आहे.मोहननगर येथील ओंकार इंजिनिअरिंग या कंपनीत मशिनचे सुटे भाग बनविण्यात येतात. मागील काही महिन्यांपूर्वी कंपनीचे उत्पादन युनिट इतर ठिकाणी हलविले आहे. मोहननगर येथील ही कंपनी मागील दोन महिन्यांपासून बंद होती. शनिवारी अचानक पाचच्या सुमारास कंपनीत आग लागली. कंपनी बंद असल्याने कंपनीत कामगार नव्हते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत कंपनीचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. कंपनीच्या कार्यालयातील संगणक व अन्य साहित्य जळाले.बालकाच्या मृत्युप्रकरणी घरमालकावर गुन्हा दाखलबालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदारासह घरमालकावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुष शंकर पवार (वय ३) या बालकाचा २६ नोव्हेंबरला रहाटणी येथील बांधकाम साईटवरील पाण्याच्या हौदात पडून मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ठेकेदार महेश पवार आणि घरमालक संग्राम होकर्णे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी आयुषचे वडील युवराज धोत्रे (वय ४७, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. रहाटणी येथे संग्राम होकर्णे यांच्या घराचे काम सुरू आहे. कामाचा ठेका महेश पवार यांच्याकडे आहे. युवराज धोत्रे त्यांच्याकडे मजूर म्हणून काम करतात. धोत्रे बांधकाम साईटवर काम करत होते. त्या वेळी त्यांचा मुलगा आयुष बांधकाम साईटवर असलेल्या पाण्याच्या हौदात पडला. त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ठेकेदार पवार आणि घरमालक होकर्णे यांनी निष्काळजीपणा दाखविल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर ठेकेदार आणि घरमालकाविरोधात बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Arrestअटक