शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत गोळीबारप्रकरणी चौघांना अटक, वाकड पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 04:59 IST

गोळ्या झाडून संतोष कुरावत याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शनिवारी पिंपरी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौघे जण स्वत:हून वाकड पोलिसांकडे हजर झाले.

पिंपरी : गोळ्या झाडून संतोष कुरावत याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शनिवारी पिंपरी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौघे जण स्वत:हून वाकड पोलिसांकडे हजर झाले. सर्व राहणारे काळेवाडी येथील असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे अन्य चार ते पाच साथीदार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.मित्रांसमवेत हॉटेलमध्ये चहा पीत असताना त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी संतोष कुरावत याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात कुरवत हा तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना पिंपरीतील साधू वासवानी उद्यानाजवळील शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी सचिन दत्तू नढे (वय २८), विकी शंभूसिंग सुतार (वय २३), विजय अरुण नढे (वय २३), अविनाश दत्तू नढे (वय २६) या आरोपींवर पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल केला आहे.हल्लेखोर पिस्तुलासह पसारफेब्रुवारी २०१७ मध्ये संतोष याने अपक्ष म्हणून महापालिका निवडणूक लढविली आहे. निवडणूक काळात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी अन्य साथीदारांसह कोयते, पिस्तूल अशी हत्यारे घेऊन आले होते. त्यांनी संतोषवर गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. पिस्तूलसह हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या संतोष यास खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.