शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील साडेचार हजार मतदार वगळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 18:22 IST

पिंपरी विधानसभा मतदार संघातील स्थलांतरित, दुबार, मृत मतदारांची नावे वगळण्याचे कामकाज सुरू आहे. मतदारसंघात तब्बल चार हजार सहाशे पंचेचाळीस मतदार वगळण्यास पात्र असून त्या मतदारांना वगळण्यात येणार आहे.

ठळक मुद्देहे काम मतदान केंद्रस्तरीय अधिका-याकडून सुरुनवीन पुनर्निरीक्षण कार्यक्रमामुळे बोगस मतदार सापडण्यास मदत होणार

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदार संघातील स्थलांतरित, दुबार, मृत मतदारांची नावे वगळण्याचे कामकाज सुरू आहे. मतदारसंघात तब्बल चार हजार सहाशे पंचेचाळीस मतदार वगळण्यास पात्र असून त्या मतदारांना वगळण्यात येणार आहे. २०६ पिंपरी विधानसभेतील मतदान केंद्रस्तरीय अधिका-याकडून मतदारांना नोटीस बजावून त्यांचे जबाब, पंचनामे करुन छाननी सुरु आहे. या बाबतचा प्रस्ताव बुधवारी सर्वसाधारणसभेत आयत्यावेळी दाखल केला.विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय नेत्यांनी मतनोंदणी अभियान मोठया प्रमाणावर राबविली होती. दोन वर्षांपूर्वी चिंचवडमधील सुमारे पंधरा हजार मतदार वगळण्यात आले होते. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या १० मे २०१८ नुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या एकूण ३९९ यादी भागातील स्थलांतरित, दुबार, मृत मतदारांची नावे वगळण्याचे काम सुरु आहे. हे काम मतदान केंद्रस्तरीय अधिका-याकडून सुरु आहे. नवीन पुनर्निरीक्षण कार्यक्रमामुळे बोगस मतदार सापडण्यास मदत होणार आहे. तसेच मतदार यादीही अद्ययावत होणार आहे. स्थलांतरित, दुबार सर्व मतदारांना नोटीस बजाविण्यात आल्या असून प्राप्त पंचनामे यांची छाननी करुन पहिल्या टप्प्यात यादीनुसार ४ हजार ६४५ मतदार वगळण्यास पात्र केले आहेत.याबाबत त्या मतदारांच्या नावाची यादी मुख्य निवडणूक आयोग, पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी -चिंचवड महापालिका या तिन्हीही वेबसाईटवर अवलोकनार्थ ठेवण्यात येणार आहे. या वगळणी कार्यक्रमाचा व्यापक प्रसिध्दीचा भाग म्हणून प्रस्तावित वगळणी करण्यात येणाऱ्या मतदारांची यादी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवली आहे.

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूक