शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगरसेवकावर चिंचवडमध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 14:48 IST

माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्यासह तीन जणांनी एकास मारहाण केल्याची घटना चिंचवड मध्ये घडली. या बाबत चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचवड - माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्यासह तीन जणांनी एकास मारहाण केल्याची घटना चिंचवड मध्ये घडली. या बाबत चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माजी नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांच्या सह चंद्या, चंद्याचा भाऊ(पूर्ण नावे समजली नाहीत) व प्रसाद जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

 या बाबत सागर रमेश कोंडे (वय ४२, रा. दत्तवाडी, पुणे) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी कोंडे हे काही कामानिमित्त चिंचवडगाव बस थांब्याजवळ थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी प्रसाद जाधव याने तुम्ही येथे कशाला आले आहात,  येथे परत दिसल्यास  तुमचे हातपाय तोडून टाकेल, अशी धमकी दिली. तसेच चंद्या याने दातऱ्या असलेल्या मुठीने कोंडे यांच्या डोक्‍यात मारहाण केली. कोऱ्हाळे यांनी लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली.इतर साथी दारांनीही लाथा मारल्या.अशी फिर्याद कोंडे यांनी दिली आहे.याबाबत पुढील तपास पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रशांत महाले करीत आहेत. 

कोऱ्हाळे हे मागील पंचवार्षिकमध्ये मनसेच्या तिकिटावर चिंचवड मधील केशवनगर भागातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.मागील वर्षी झालेल्या  निवडणुकीत त्यांनी मनसेला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला.मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता.