शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकाम कारवाईचा फार्स, ५३ बांधकामे भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 05:55 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. शहरातील विविध भागात महापालिका, प्राधिकरण, म्हाडा, रेडझोन अशा विविध परिसरातील मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असताना डिसेंबर महिन्यात शहरातील विविध भागात अनधिकृतपणे सुरू असलेली ५३ बांधकामे भुईसपाट केली आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. शहरातील विविध भागात महापालिका, प्राधिकरण, म्हाडा, रेडझोन अशा विविध परिसरातील मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असताना डिसेंबर महिन्यात शहरातील विविध भागात अनधिकृतपणे सुरू असलेली ५३ बांधकामे भुईसपाट केली आहेत. याप्रकरणी २६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गाजला होता. शहरातील न्यायालयात दाखल झालेल्या दोन याचिकांच्या सुनावणीमुळे अनधिकृत बांधकाम प्रश्न राज्यभर गाजला होता. त्यावरून पक्षीय राजकारण झाले होते. अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरणाचे विधेयक राज्य सरकारने संमत केले आहे. भविष्यात होणाºया बांधकामांवर कारवाई करावी, असे निर्देश सरकारने दिले आहेत. मात्र, बांधकामांवर कारवाई करण्यात महापालिका प्रशासन कुचराई करीत आहेत.मालकाच्या नावाबाबत गुप्तताअनधिकृत बांधकामांना निर्बंध असतानाही महापालिका परिसरात सर्रासपणे बांधकामे सुरू आहेत. ही बांधकामे पाडताना महापालिका प्रशासन पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप राष्टÑवादी काँगे्रेसने केला होता. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाच्या वतीने शहरातील टपºया, पत्र्याच्या शेड अशा छोट्या बांधकामांवर कारवाई सुरू आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या वतीने नवी सांगवीतील मधुबन सोसायटीत अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई केली. कोणावर कारवाई झाली, याबाबत कार्यकारी अभियंत्यांना विचारले असता, ते अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्यामुळे अतिक्रमण विभागाच्या गोपनीय बांधकाम पाडापाडी मोहिमेची चर्चा महापालिकेत सुरू आहे. अनधिकृत बांधकामांचे विधेयक मंजूर करताना नव्याने बांधकामे होणार नाहीत, याबाबत महापालिकांनी उपाययोजना करावी, अशा सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. सन २०१५पर्यंतच्या बांधकामांना संरक्षण दिले आहे. नवी सांगवी परिसरात आज दुपारपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली. मधुबन सोसायटीतील १० गुंठे जागेवर ही पाच मजली इमारत असून, तिचे काम अनेक दिवसांपासून सुरू होते. सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. एका बांधकाम व्यावसायिकाचे हे बांधकाम असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. संबंधित बांधकाम कोणाचे, मालक कोण, याबाबत माहिती विचारली असता, ‘आम्हाला माहिती नाही; माहिती घेत आहोत’ असे उत्तर दिले. त्यामुळे महापालिकेच्या गोपनीय कारवाईबाबत महापालिका वर्तुळात चर्चा होती.अधिकृतसाठी केवळ सात अर्जदि. २१ जुलै २०१७ रोजी नगरविकास खात्याने राज्यातील ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबाबतची अधिसूचना जारी केली. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित होणार आहेत. त्यासाठी सहा महिन्यांची मुदत असून, तीन महिने संपले आहेत. परंतु, त्या नियमावलीत जाचक अटींमुळे नागरिकांचा बांधकाम नियमित करण्यास प्रतिसाद मिळत नाही. गेल्या तीन महिन्यांत पालिकेकडे केवळ सात अर्ज प्राप्त झाले आहेत. अटी आणि नियम जाचक असल्याने बांधकाम नियमितीकरणासाठी नागरिकांची अनास्था असल्याचे दिसून येत आहे.अंमलबजावणी धिम्या गतीनेमहापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाने डिसेंबर महिन्यात शहरातील विविध भागात सुरू असलेली ५३ अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली आहेत. यामध्ये २४ हजार ३५० चौरस मीटर क्षेत्रफळ मोकळे केले. याप्रकरणी २६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. नाताळ, नवीन वर्ष, महाराष्ट्र बंद अशा विविध कारणांमुळे अनधिकृत बांधकामावरील कारवाई थंडावली होती. आता महापालिका वेग देणार आहे. आगामी काळात अनधिकृत बांधकामावरील कारवाई पालिका वेगात करणार आहे, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात कारवाई होत नाही.राजकीय उद्देशाने कारवाईकोणत्याही प्रभागात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अतिक्रमण विभागाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी करतात. सद्य:स्थितीची छायाचित्रे काढतात. त्यानंतर मालकाला बांधकाम काढून घेण्यासंदर्भात नोटीस देतात. पंधरा दिवसांचा वेळही देण्यात येतो. त्यानंतरही संबंधितांनी बांधकाम काढून न घेतल्यास अतिक्रमणविरोधी पथकाच्या वतीने कारवाईचा दिवस आणि वेळ निश्चित केली जाते. त्यानंतर नियोजित वेळेनुसार पोलीस बंदोबस्तात कारवाई केली जाते. तसेच जवळच्या पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हाही दाखल करण्यात येतो. एरवी कारवाईची माहिती देण्यासाठी अतिउत्सुक असणाºया महापालिका प्रशासनाकडून गोपनीयता का पाळली जात आहे, याबाबत संभ्रम आहे.

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड